हिंगणघाट: का अशा भष्ट्राचारी नेत्यांना निवडूण दिले पाहीजे काय जनतेनेॽ ‘आपण दोघं भाऊ मिळून मिसळून खाऊ’ समीकरण.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जेव्हा राजकारणी भष्ट्राचार करून गावाचा आणि शहराचा विकास पोखरून खातो आणि निवडणूक आली की तोड वर करून गावाच्या विकासाच्या गप्पा मारतो फिरतो तेव्हा अशा नेत्यांची कीव करावी तितकी कमी आहे.

सध्या हिंगणघाट शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागल आहे. सर्वत्र नगर पालिका निवडणुकीची चर्चा शुरू झाली आहे. पण शहरातील राजकीय नेत्यामध्ये ‘आपण दोघं भाऊ मिळून मिसळून खाऊ’ असे समीकरण मागील पाच वर्षात दिसून येत असल्यामुळे एकाही पार्टी मध्ये आपल्या नेत्याला घेउण कार्यकर्तामध्ये उत्साहाच वातावरण नाहीॽ नेता तुपाशी आणि कार्यकर्ता उपाशी असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सध्या तरी अशा नेत्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.

हिंगणघाट शहरातील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून शासनाने हिंगणघाट शहरातील डकीन परिसरात वेणा नदीवर बंधरा बाधण्यासाठी मंजुरी दिली. पण तत्कालीन नगर पालिकेचे नगराध्यक्ष यांनी वेणा नदी वर अपूर्ण बंधारा बाधून ५ करोड़ ३३ लाखाचा भष्ट्राचार केला. या भष्ट्राचार केल्यामुळे हिंगणघाट शहरात नागरिकांना भविष्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. याचे सर्व श्रेय तत्कालीन नगर पालिकेचे नगराध्यक्ष यांना दिले पाहिजे.

हिंगणघाट शहरात झालेल्या बंधारा भष्ट्राचार प्रकरणी शरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी उच्च न्यायालय नागपुर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. आणि न्यायालयाने वेणा नदीवरील बंधाऱ्यात भष्ट्राचार झाल्याचे मान्य करून दिनांक २ ऑगस्ट २०१७ ला महाराष्ट्र राज्य सचिवाला निर्देश दिले की ५ आठवड्यात उत्तर द्या, परंतु आता पर्यंत सचिवालय ने उत्तर दिले नाही. या भष्ट्राचाराला पाठबळ देणारे भष्ट्राचाराचे कार्यसम्राट कोण? ज्यामुळे इतका मोठ्या भष्ट्राचार पाचविण्यात आला.

मागील पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या प्रत्येक नेत्यांनी गोकुलधाम येथील सभेत सागितले की तुम्हीं भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बनवा, भाजपचा नगराध्यक्ष बनताच आम्ही बंधाराच्या भ्रष्टाचारी नेत्याला तुरूगात टाकु. पण नगराध्यक्ष बनल्यानंतर ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अस 5 वर्ष चालल.

जेव्हा विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचे पाय चिखलात असेल तर भष्ट्राचाराला विरोध तरी करणार कोण? हिंगणघाट शहरातील भाजपाचे माजी नगराध्यक्ष यांनी निवडणुक आयोगची दिशा भूल करूण नगराध्यक्ष ची निवडणुक लढवली तेव्हा प्रेम साजनदास बसंतानी वर नगर पालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स गाळेचा किराया भी बाकी होता. निवडूण आले नंतर बाकी किराया भरन्यात आला. त्यामुळे तत्कालीन नगर पालिका मुख्याधिकारी यांनी बसंतानी यांना पायउतार करावे म्हणून वर्धा जिल्हाधिकारी यांना पत्र लिहल होते. पण कारवाई थंड बस्त्यात टाकण्यात आली. त्यात शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कार्यात मोठा भष्ट्राचार झाल्याचे दिसून येत आहे. भूमिगत गटार योजनेच्यायाअंतर्गत बांधण्यात आलेल्या चेंबरच्या आत मध्ये ठेकेदाराने छपाई केली नाही त्यामुळे हे चेंबर पूर्णत्व भगवान भरोसे असल्याचे दिसून येत आहे.

हिंगणघाट जल अमृत योजना अंतर्गत पाण्याचा टाक्या तर बाधन्यात आल्या. पण बंधारा कामातील भष्टाचारामुळे बंधारा अपूर्ण आहे. त्या टाक्यातील पाणी चोरीला गेले आहे. त्या मुळे हिंगणघाट मधे उन्हाळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधीच संपू शकणार नाही. आणि टाक्या फक्त शो पीस बनुन उभी राहणार आहे. याला फक्त असे भष्टाचारी नेते जबाबदार राहणार आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

26 mins ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

2 hours ago