आशिष वरघणे यांच्या “जगणं महाग होत आहे” पुस्तकाचे प्रकाशन

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रा. सु. बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हिंगणघाट द्वारा आयोजित” राष्ट्रीय सेवा योजना” व “युवारंग-२०२३” या कार्यक्रमात सिरूड या गावचे उभरते कवि-लेखक आशिष आत्माराम वरघणे यांच्या “जगणं महाग होत आहे” या कथासंग्रहाचे प्रकाशन महाविद्याल याचे प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर, कला विभागाचे प्रमुख डॉ.राजू निखाडे, विज्ञान शाखेचे डॉ. व्ही. टी. झाडे, क्रिडा विभागाचे डॉ. बलराज अवचट, डॉ. शरद विहीरकर आय. क्यू. ए.सी. समनव्यक, डॉ. गजानन ठक सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. शंकर बोंडे वाणिज्य शाखा प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरघणे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीकृष्ण बोढे यांनी तर आभार प्रा.विकास बेले यांनी मानले.

आशिष वरघणे बिडकर कॉलेज मध्ये एम. ए. मराठी प्रथम वर्षाचे विद्यार्थी असून ते गेल्या दशकापासुन कथा-कविता लिहीत आहे. त्यांच्या “जगणं महाग होत आहे” या पुस्तकाला नवलेखक अनुदान योजना २०२२ या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांचे अनुदान मिळाले आहे. त्यांच्या पुस्तकाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. किशोर सानप यांची प्रस्तावना असून ब्लर्ब ख्यातनाम साहित्यिक डॉ. राजन गवस यांचे आहे. तर पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिध्द चित्रकार सरदार जाधव यांचे मिळाले असून अमरावती येथील पायगुण प्रकाशन या संस्थेमार्फत त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी अमित शहाचा सांगली मध्ये निदर्शने करून कऱण्यात आला निषेध.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

22 hours ago

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा राजुऱ्यात काँग्रेसकडून निषेध.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

22 hours ago