✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आधीच अवघा देश महागाईच्या खाईत होळपळत असताना एन होळी पुर्व संध्येला गॅस सिलेंडरची दरवाढ केल्याने होळीचा रंग देशवासियासाठी बेरंग झाला आहे. त्यामुळे महिलेचे घराचे बजेट बिघडले आहे.
घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर महागले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयाने महागले आहेत. तर व्यासायिक गॅस सिलेंडर ३५० रुपयांनी महागला आहे. त्यामुळे महिला वर्गात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महागाईच्या खाईत आधीच सामान्य नागरिक त्रस्त असताना केंद्र सरकारने गॅस सिलेंडरची दरवाढ केली त्यामुळे सर्व सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. या दरवाढीच्या विरोधात नागपूर ग्रामीण महिला काँग्रेसच्या वतीने उमरेड येथे आंदोलन करण्यात आले. महिलांनी रस्त्यावर चुलीवर स्वयंपाक बनवून गॅस दरवाढीला विरोध दर्शवून आंदोलनं केले.
ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्ष व जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या नेतृत्वात उमरेड शहर महिला काँग्रेसतर्फे उमरेड भिसि नाका चौक येथे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक केला व गॅस दरवाढीचा निषेध केला. काँग्रेसचे देशात सरकार असताना 550 रुपयात मिळणारे सिलेंडर आज 1150 रुपयावर गेले आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात चुली मांडून त्यांनी निषेध व्यक्त केला.
यावेळी उमरेड शहरच्या महिला काँग्रेसचे अध्यक्ष योगिता ईटणकर, सुरेखा रेवतकर, कल्पना हवेलीकर, गीतांजली नागभीडकर, श्वेता मोहोड, श्वेता भिसे, प्रियंका लोखंडे, वनिता भुते, सविता भुरे, सुनिता थुटान, प्रसन्ना गुजरकर, आशा शिरसीकर यांच्यासह उमरेड विधानसभेच्या सर्व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व उमरेड काँगेस कमिटीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…