एटापल्ली तालुक्यातील जारावंडीतील नागरिकांचा पाण्यावरील खर्च वाचणार, नागरिकांना मिळणार घरातच स्वच्छ पाणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळावे या हेतूने शासनाच्या वतीने जलजीवन मिशन योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी गावाची निवड करण्यात आली असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या योजनेमुळे नागरिकांचा पाण्याचा खर्च कमी होणार असून स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळणार आहे.
याप्रसंगी बोलताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत नळाद्वारे पाणी येणार आहे परंतु पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचे नियोजन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे.असे आवाहन केले.
38 लाख 17 हजार 246 रुपयांच्या निधीतून जारावंडी येथे जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा काम पूर्ण केले जाणार आहे. याप्रसंगी माजी प स सभापती बेबीताई नरोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार,सचिव सुमन दुर्वा, सरपंच सपना कोडापे, येमलीच्या सरपंच ललिता मडावी, माजी नगरसेविका सगुणा कांदो, जारावंडी येथील उपसरपंच, सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…