वर्धा जिल्हात वाळू तस्करी; खनिकर्म अधिकारी थेट दुचाकीने पोहचले वाळू घाटावर, तस्कराचा डाव फासला.

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील गुंजखेडा या वाळूघाटावर जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी दुचाकीने जात वाळूघाटावर धाड टाकली. खनिकर्म अधिकारी अचानक पोहचल्याने तराफ्याच्या सहाय्याने वाळू काढत असलेल्या मजुरांनी तेथून पळ काढला. कारवाईत वाळू काढण्यासाठी बनविण्यात आलेले तराफे जप्त करण्यात आले आहे.

गुंजखेडा वाळूघाटावर मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याची चर्चा सगळीकडे एकावयास मिळत होती. वाळू काढण्यासाठी ड्रमच्या सहाय्याने तराफे तयार करून मजुराच्या सहाय्याने येथून वाळू उपसा सुरु होता. मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करत टॅक्टरच्या सहाय्याने विकल्या जातं होती. अनेकदा कारवाई करूनही वाळू माफियांचा हा गोरखधंदा सुरूच असल्याने जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी थेट दुचाकीने येत या ठिकाणी कारवाई केली.

खनिकर्म अधिकारी पोहचताच चार तराफ्याद्वारे आठ मजूराच्या साहाय्याने पाण्याखालील वाळू काढत होते. खनिकर्म अधिकाऱ्यांचा पथक दिसताच मजुरांनी तेथून पळ काढला. या कारवाईत घाटावरील काही साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. तर इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी केली असून त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यालयातील तुषार शिंदे या कर्मचाऱ्याचा सहभाग होता.
मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी अमित शहाचा सांगली मध्ये निदर्शने करून कऱण्यात आला निषेध.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

22 hours ago

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा राजुऱ्यात काँग्रेसकडून निषेध.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

23 hours ago