समुदरपुर पोलिसांची होळी व धूलिवंदन सणानिमित्त मौजा गणेशपुर पारधी बेड़ा येथे वॉश आउट मोहीम.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 04 मार्च:- वर्धा जिल्हातील समुद्रपुर पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी अवैध व्यवसायावर अंकुश आणण्यासाठी कडकं कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्याचे धागे दनकावले आहे.

समुद्रपुर डि.बी. पथकाचे पो.हवा./261 अरविंद येनुरकर सोबत पो.हवा./662 अजय वानखेडे, पो.ना./1245 रवि पुरोहित, पो.शि./1626 वैभव चरडे व 13 होमगार्ड सैनिक यांनी आगामी होळी व धूलिवंदन सणानिमित्त पो स्टे समुद्रपुर परिसरातील मौजा गणेशपुर पारधी बेड़ा येथे वॉश आउट मोहीम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यामागील जंगल परीसरातील नाल्यालगत असलेल्या झुडपी शिवारात जमिनीत गाडुन असलेले व झुडपात लपवुन ठेवुन असलेले लहान, मोठे 56 प्लास्टीक ड्रम व 12 लोखंडी ड्रममध्ये अंदाजे 6,100 लीटर कच्चा मोहा सड़वा रसायन प्रति लीटर 50 रु प्रमाने किं. 3,05,000 रु, 56 प्लास्टीक ड्रम किं. प्रती ड्रम 300 रू प्रमाणे किं. 16,800 रू, 12 लोखंडी ड्रम प्रती ड्रम किं. 500 रू. प्रमाणे किं 6,000 रू., असा एकुण किं. 3,27,800 रू. 05 प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 150 ली. मोहा दारू प्रती लि. 100 रू. प्रमाणे कॅनसह किं. 16,000 रू. 04 पोत्यामध्ये अंदाजे 200 किलो गुळ प्रती किलो 40 रू प्रमाणे किं. 8,000 रू., 1 जर्मन घमेला किं 1,000 रू. असा जु.किं. 3,52,800 रू. चा मोठ्या प्रमाणात मोहा सड़वा रसायन, गुळ व मोहा दारू चा माल मिळुन आला असुन, संपुर्ण मुद्देमाल जागीच नाश करून दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन,

अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांचे मार्गदर्शनात पो.हवा. अरविंद येनुरकर, अजय वानखेडे, पो.ना. रवि पुरोहित, पो.शि. वैभव चरडे व 13 होमगार्ड सैनिक यांनी केली.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात ख्रिचन कब्रस्थानात चौकीदाराची हत्या, आठवड्यातील पाचवे हत्याकांड.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र…

30 mins ago

आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर निघण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज* – *संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ.

*जिल्हा यंत्रणेचा आढावा बैठक संपन्न* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. गडचिरोली :…

2 hours ago

युवकांनी खेळाला आत्मसात करावं : अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन.

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन....!* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो.…

3 hours ago

सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला पुणे येथून अटक; सीआयडी पथकाची कारवाई

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- संपूर्ण राज्यात खळबळ उडवून…

12 hours ago

हिंगणघाट स्थानकावर स्टेशन सल्लागार समितीची बैठक संपन्न.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील हिंगणघाट…

23 hours ago

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जगद‍्गुरु श्री तुकाराम महाराज…

23 hours ago