निलेश सातपुते उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्काराने सन्मानित, चंद्रपुर येथे पुरस्काराचे वितरण.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली, ५ मार्च:- माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा उत्कृष्ट डिजिटल मीडिया पत्रकार पुरस्काराने लोकवृत्त न्यूज पोर्टल चे संपादक तथा राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी निलेश सातपुते यांना सन्मानित करण्यात आले. आज रविवार ५ मार्च रोजी चंद्रपुर येथील कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृहात वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळा पार पडला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.

निलेश सातपुते हे गत २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते राज्य दैनिक बाळकडूचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी असून लोकवृत्त न्यूज चे संपादक आहेत व गडचिरोली नामांकित पत्रकार आहे. निष्पक्ष निर्भीड व अभ्यासू पत्रकार अशी स्वातंत्र्य ओळख निर्माण केली असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, क्रीडा व कृषी साहित्य, धार्मिक, क्षेत्रात त्यांनी सातत्याने लिखाण केले व अनेक प्रकरणांना वाच्याता फोडली. त्यांचे पत्रकारितेतील कार्य प्रेरणादायी आहे. नुकताच त्यांनी ६ जानेवारी २०२३ ला पत्रकार दिनाचे औचित्य साधून डिजिटल मीडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा येथोचित सत्कार सोहळा व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर परिचर्चा घडवून आणले व डिजिटल मीडियात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला.
तसेच यावरच न थांबता त्यांनी आपल्या संकल्पनातून डिजिटल मीडियात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना एकत्रित आणून त्याकरिता विविध कल्याणकारी योजनेसह विमा कवच व आजची पत्रकारिता व त्यासमोरील आव्हाने या विषयावर महाराष्ट्र अभ्यास दौरा नियोजन करून आयोजन केलेले आहे. कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या समस्येला लढा देण्याचे त्यांच्या कार्याची दखल घेत माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्यूज तर्फे यावर्षीचा डिजिटल मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातून निलेश जीवनदास सातपुते यांना जाहीर केला. सदर पुरस्काराने सन्मानित केल्याने होमदेवजी तुम्मेवार महाराष्ट्र मत न्यूज २४ तास संपादक, मित्रपरिवार, पत्रकार, डिजिटल मीडिया संपादक, व विविध स्तरातून तसेच मीडियामध्ये कार्यरत असलेल्या आदींकडून निलेश सातपुते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अपेक्षित, वंचित, शोषित दिन दुबळ्या साठी काम केले हे माझे मार्गदर्शक मोरेश्वर उद्योजवार ‘खरे वृत्तांत’ न्यूज संपादक व माझे स्नेही सचिन जिवतोडे संपादक ‘द गडविश्व’ न्यूज गडचिरोली यांच्यामुळे शक्य झाले. प्रतिष्ठानाने त्यांच्या कार्याची दखल घेतली याचा मला खूप आनंद झाला. मी या प्रतिष्ठानचा आभारी आहे, या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली, हा पुरस्कार मी माझे पूज्य आई वडिलांना अर्पण करतो. हा पुरस्कार मला प्रेरणा देईल. निलेश सातपुते, संपादक लोकवृत्त न्यूज पोर्टल तथा गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी राज्य दैनिक बाळकडू

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

5 mins ago

अभिनव विचार मंच तर्फे सोपानदादा कनेरकर यांचा कौटुंबिक प्रबोधन जागर जाणिवांचा कार्यक्रमाचे 25 डिसेंबर रोजी आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…

12 mins ago

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा निधी तात्काळ देण्यात यावा: रवि धोटे यांच्या नेतृत्वात निवेदन.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- विधानसभा २०२४ च्या निवडणूकानंतर फक्त…

23 mins ago

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

2 hours ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

2 hours ago