लेखक: अरुण निकम
9323249487-8459504317
आज सकाळी लोकसत्तेतील “लोकरंग” ह्या सदरातील ” बोंब मारण्याची अभिनव कला” हा लेख वाचनात आला. त्यामुळे दोन दिवसा वर असलेल्या “होळी”ची आठवण झाली. ” होळी” आणि “बोंब” हे दोन शब्द कायम हातात हात घालून येतात. कारण होळी आणि बोंबा मारणे हे दोन वेगवेगळे शब्द जरी असले तरी, होळी पेटली की हमखास बोंबा मारल्या जातात.
लोकसत्तेतील लेखाचा हेतू सर्वस्वी वेगळा आहे. “होळी आणि बोंबा” ह्यांचा परस्पर संबंध काय? त्यांचा एकत्रच उल्लेख का येतो? हे आणि अशा प्रश्नांनी मनात गर्दी केली.
सहाजिकच प्रश्न पडला की, माणूस बोंब कधी मारतो?
एक तर अत्यानंदाने उत्तेजित झाल्यामुळे, इतरांना सहभागी करून घेण्यासाठी तो जोरजोराने ओरडून “बोंबाबोंब” करतो. कधी कधी आकस्मित संकटाला तोंड देण्यासाठी इतरांची मदत मिळावी म्हणुन तो “बोंबा” मारतो. पूर्वी राजेशाही काळात “दवंडी” पीटली जात असे. ती देखील “बोंबाबोंब” सदरात येते.
शालेय पुस्तकामध्ये जुलमी राजा हिरण्यकश्यपू , त्याची बहीण होलीका व त्याचा विष्णु भक्त मुलगा प्रल्हाद ह्यांची गोष्ट सर्वांनी वाचलेली आहे. ही कथा सर्वश्रुत असल्यामुळे तो उल्लेख टाळून, विष्णुने नरसिंहाचे रूप धारण करून राजा हिरण्यकश्यपू ह्याचा वध केला. त्याप्रीत्यर्थ हा आनंदोत्सव साजरा करताना होळीत अधर्माचे दहन करून बोंबा मारीत आनंद व्यक्त करण्याची प्रथा आहे.
काही लोकांच्या मते ह्या दिवशी पुतना राक्षसीनीने बाळ श्रीकृष्णाला विषमिश्रित अंगावरील दूध पाजण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तेव्हा गावकर्यांनी होळी करून तिचे दहन केले.
काही लोक असेही मानतात की, होळीला ते “कामदहन” असेही म्हणतात. कामदेवाने भगवान शंकराला शिलभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणुन शंकराने कामदेवाला भस्म करून टाकले.
कुणी कशावर विश्वास ठेवावा किंवा कुणावर ठेऊ नये. हा प्रत्येकाचा वैयक्तीक संवैधानिक अधिकार आहे. परंतु ढोबळ मानाने वरील सर्व कथांमध्ये एक समान धागा दिसून येतो. तो म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून सत प्रवृत्तींच्या विजया प्रीत्यर्थ आनंदोत्सव साजरा करणे.
ह्या सदरात अजून एक प्रकार मोडतो. तो म्हणजे एखाद्याच्या आर्त किंकाळ्या इतरांना ऐकू जाऊ नये म्हणुन अनेकांनी एकाच वेळी बोंबा मारून कल्ला करून तो आवाज दाबून टाकणे.
आपण जास्त मागे न जाता 200 ते 300 वर्षे मागे जाऊ या. आपल्या देशातील परंपरागत संस्कृतीने स्त्रियांना फक्त मुलं जन्माला घालणारे यंत्र समजून, त्यांची कक्षा “चूल आणि मूल” इतकी मर्यादित केली होती. त्या सर्व अधिकारांपासून वंचित होत्या. शिक्षणापासून तर त्या कोसो मैल दूर होत्या. सर्व प्रकारची व्रत वैकल्य तिच्याच माथी मारली गेली आहेत. आताच्या काळात देखील स्त्री सुशिक्षित होऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन कुटुंबाच्या उत्पन्नात त्याच्याच बरोबरीने सहभागी होते तरी, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार तिला एकटीला पूर्ण करावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. किती नवरे कमावत्या बायकोला घरच्या जबाबदार्या पार पाडण्यात मदत करतात हा संशोधनाचा विषय आहे. स्वतंत्र पूर्व काळात पुरुषाला अनेक बायका करण्याचा अधिकार होता, परंतु पतीच्या मृत्यूनंतर तिला त्याच्याच चितेवर सती जाण्याची सक्ती होती. ही प्रथा सुरुवातीला राज घराण्यात प्रचलित होती. त्यांना अनेक राण्या असत. अर्थातच त्यांनी सुंदर स्त्रियांची निवड केलेली असे. राजाच्या मृत्युनंतर त्यांचा कुणी उपभोग घेऊ नये म्हणुन ही पद्धत प्रचलित होती. इथेही पुरुषी अहंकार दिसून येतो. स्त्रियांना इतकी जाचक बंधनं का घातली होती. तो मोठा इतिहास असून, इथे सांगणे अप्रस्तुत आहे. ही सर्व बंधनं हेतुपुरस्सर घालण्यात आली होती. हे मात्र निश्चित.
सन 1828 मध्ये जुन्या जाचक आणि मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणार्या रूढीं विरोधात श्री. राजा राममोहन रॉय ह्यांनी “ब्रम्हो समाजाची ” स्थापना केली. त्यांनी सतीच्या प्रथेविरुद्ध चळवळ उभी केली. त्याला सन 1829 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विलीयम बेंटीक ह्यांनी “सती प्रथा बंदी” ला मंजुरी दिली. आताच्या पिढीला “सती” प्रथा काय होती, ते सांगणे आवश्यक आहे. स्त्रीचा पती मेल्यानंतर, त्याच चितेवर पत्नीने अग्निप्रवेश करून स्वतःची आहुती देणे.
ह्या पृथ्वीतलावर कोणताही सजीव आगीला कवटाळून स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत होणे, ही सर्वस्वी अशक्य गोष्ट आहे. साधी आगीची आच लागली तरी तो त्यापासून दूर जातो. मग एक हाडामांसाची स्त्री, कशी काय स्वतःहून सती जाईल.
वस्तुस्थिती अशी आहे की, त्या स्त्रीला जबरदस्तीने चिते मध्ये ढकलले जात असे. चौफेर पुरुष मंडळी हातात लांब काठ्या घेऊन उभे राहत. अग्नी च्या झळा लागताच ती जोरजोरात किंचाळून, स्वतः चा बचाव करण्याचा प्रयत्न करू लागली की, लोक त्या काठय़ांनी तिला पुन्हा अग्नीत ढोसून देत. ह्या तिच्या आर्त किंकाळ्या अन्य लोकांना ऐकू जाऊ नये म्हणुन जोरजोरात बोंब मारून गलका करून तिचा आवाज दाबून टाकीत. हा सर्व सहनशक्तीचा कडेलोट करणारा किळसवाणा प्रकार इतर स्त्रियांनी पाहू नये म्हणुन त्यांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यास बंदी होती.
गरज ही शोधांची जननी असल्याचे म्हंटले जाते. समस्त मानवाच्या गरजेतून सर्व प्रथा, परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यानुसार काही लोकांचे असे ही म्हणने आहे की, फाल्गुन महिन्यात वसंत ऋतूच्या आगमनात पानगळति होते. त्यामुळे घराभोवती कुजलेल्या पानांचा व सुक्या काटक्याचा कचरा साचल्यामुळे येणारा घाण वास आरोग्यास अपायकारक असतो. त्यामुळे त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा खणून त्यांची होळी केली जाते. वातावरण प्रदूषणमुक्त होण्यास मदत मिळते.
सध्याच्या काळाचा विचार करता असे दिसून येते की, महाराष्ट्रासह हरयाणा, दिल्ली, उत्तरेतील हिंदी भाषिक पट्टा येथे गहु आणि हरभर्यांचे पीक कापायला आलेले असते. त्यामुळे पहिला पुरणपोळीचा घास देवाला भरविण्याची पद्धत आहे. मग तो घास देवासमोर का ठेवले जात नाही? तो होळीत का टाकला जातो ?आपल्याकडे होम करून त्यात टाकलेल्या वस्तू देवापर्यंत पोहोचतात असा समज आहे. त्यानुसार इथे देखील देवाचा नैवेद्य होळीला अर्पण केला तर तो देवाला मिळतो अशी भावना आहे.
आपल्याकडे विविध प्रकारचे रिती, रिवाज, अंधश्रद्धा प्रचलित आहेत. त्यावर खूप मतभिन्नता देखील आहे. त्यामुळे ह्या लेखाचा अर्थ ज्याने त्याने आपल्या वकुबानुसार काढावा…. ही विनंती.
हे लेखक यांच वैयक्तिक मत आहे. याबद्दल महाराष्ट्र संदेश न्युजच काहीही संबंध नाही.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…