फेसपेंटिंग करून विध्यार्थीनी दिले विविध संदेश.
समाजातील दुर्गुनांची केली होळी, प्लास्टिक कचरा नगर परिषदेच्या स्वाधीन.
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 6 मार्च:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरी सेना छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट व जिजामाता गाईड युनिटच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक होलिकोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सतीश धोटे, अध्यक्ष, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून भास्करराव येसेकर, सचिव, मधुकर जाणवे, संचालक, नेफडो अंतर्गत असलेल्या समित्याचे पदाधिकारी अल्का सदावर्ते, नागपूर विभाग अध्यक्षा, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विभाग, विलास कुंदोजवार, वनपाल तथा नागपूर विभाग अध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती, संतोष देरकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास समिती, दिलीप सदावर्ते, चंद्रपूर जिल्हा जनसंपर्क अधिकारी नेफडो, बबलू चव्हान, चंद्रपूर जिल्हा युवा सचिव, नेफडो, सारीपुत्र जांभुळकर मुख्याध्यापक, आदर्श हायस्कूल, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक शाळा, ज्येष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, पालक प्रतिनिधी विजय तलांडे, किशोर वरवाडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट लीडर बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी पर्यावरण पूरक होलिकोत्सव साजरा करण्यात येतो. शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिकचा कचरा हा नगर परिषदेच्या स्वाधीन करण्यात येतो. तर समाजातील व माणवी मनातील असलेले दुर्गुण, वाईट कृती, व्यसन, वृक्षतोड, कुपोषण, वन्य प्राण्यांची शिकार, अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार, आळस, द्वेष, प्लास्टिकचा वापर, भेसळयुक्त पदार्थ, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, कोरोना जातीभेद, मोबाईलचा अतिवापर, मोबाईलवरील जीवघेणे खेळ, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा विविध विषयाना होळी च्या माध्यमातून अग्नी देण्यात येते. यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी फेस पेंटिंगच्या माध्यमातून सेव टायगर, सेव वॉटर, सेव्ह नेचर, सेव ट्री, वाढते प्रदूषण असे संदेश दिले. हे आकर्षणाचे विषय ठरले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार बादल बेले यांनी मानले. विध्यार्थीनी तयार केलेल्या नैसर्गिक रंगाची होळी सुद्धा साजरी करण्यात आली. राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी लक्षवेधी नृत्य सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…