राजुरा येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व विविध बांधकामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न.

तेली समाजाने संघटित होऊन प्रगती साधावी.- आमदार सुभाष धोटे

संतोष मेश्राम चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुका तेली समाजाच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व विविध बांधकामाचे भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक सभागृह राजुरा गडचांदूर रोड, सास्ती टी पॉइंट जवळ, रामपूर, राजुरा येथे करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, राजुरा विधानसभा क्षेत्रात तेली समाजाची संख्या मोठी आहे. अनेक क्षेत्रात समाजातील लोकांनी आपले नावलौकिक मिळविले आहे. तेली समाजाने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रेरणेने संघटित होऊन आनखी प्रगती साधावी, समाजातील विद्यार्थी, गरजू लोकांच्या कल्याणासाठी उपक्रम हाती घेवून समाजाला अधिक सशक्त करावे असे आवाहन केले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्य कार्याध्यक्ष अतुल वांदिले, प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, पूर्व विदर्भ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष अजय वैरागडे, नागपूर विभागीय अध्यक्ष म. प्रा. तै. जगदीश वैद्य, महासभेचे नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष पुष्कर डांगरे, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, माजी पंचायत समिती सभापती कुंदा जेणेकर, तालुका अध्यक्ष काँग्रेस रंजन लांडे, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, शैलेश जुमडे,माजी जिल्हा सचिव, तैलिक युवा एल्गार संघटना यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी चंद्रपूर लोकसभेचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे स्थानिक विकास निधी अंतर्गत २५ लक्ष रुपयांचे सभागृह बांधकाम भूमिपूजन, आमदार सुभाष धोटे यांचे स्थानिक विकास निधी अंतर्गत रुपये १५ लक्ष रुपयांचे स्वच्छतागृह व संरक्षण भिंत भूमिपूजन, संताजी शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन आ. सुभाष धोटे व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. सकाळी ११ वाजता संत संताजी जगनाडे महाराज यांची भव्य पालखी शोभयात्रा जुने बस स्थानक मार्गे राजुरा शहरातील मुख्य बाजारपेठेतून कार्यक्रम स्थळापर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी रुद्र किशोर बानकर यांनी संताजी महाराजाच्या वेशभूषेत व कुमारी प्रांजल मनीष मंगरूळकर हिने यमुनाबाई च्या वेशभूषेत पालखी यात्रेत सहभाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सरिता गणेश लोहबडे या आदर्श हायस्कुल राजुरा शाळेतील विध्यार्थीनीने संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केले. अनेक बालगोपालांनी, युवक, युवती, जेष्ठ, महिला यांच्या सह भजन मंडळ व समाज बांधव पारंपरिक वेषभूषेत आपले योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष मंगरूळकर यांनी केले, प्रास्ताविक पुरुषोत्तम गंधारे यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रप्रकाश बुटले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेली समाज युवक मंडळ, विदर्भ तेली समाज महासंघ, श्री संत संताजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा, तेली समाज कल्याण मंडळ वेकोली, तेली समाज रामपूर, सास्ती राजुरा सह तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सदस्यांसह तेली समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

1 hour ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

3 hours ago