वर्धा जिल्हात महिला सरपंच यांना समाज कंटकाद्वारे जीवी मारण्याची धमकी व अश्लील शिवीगाळ, होणार काय कारवाई?

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील पिंपळगाव येथील महिला सरपंच यांना समाजकंटकाद्वारे जीवी मारण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राम पंचायतचे सरपंच सदस्य गण व गावकरी यांनी घेतली भीम आर्मी चे नेते यांची कार्यालयात भेट घेतली.

पिंपळगाव येथील महिला सरपंच व सदस्य गण हे आपले कामकाज सहनियोजित पणे करतात पण काही समाजकंटकांना ते खपवल्या न गेल्यामुळे त्यांनी सरपंच याचा कट काढण्यासाठी सरपंच हे काही कामानिमित्त गावात गेले असता सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान त्यांना अश्लील शिवीगाळ आणि जीव मारण्याची धमकी देण्यात आली.

सरपंच हे सेवेसाठी गावाच्या विकासासाठी काम करत असताना सरपंच महिलेला आधार नसताना सुद्धा मानव सेवा देणे हेच त्यांची उद्दिष्ट आहे मागील दोन वर्ष अगोदर त्यांच्या पतीची दुःखी निधन झाले आपल्या घर परिवाराला सांभाळून आणि गावच हे आपले परिवार यांच्याशी नातं ठेवून सेवा भावनेने काम करत असते पण तेथील त्यांना काम करणे आता अवघड झाले आहे त्यांनी झालेल्या त्रास संबंधित प्रकार पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा केली आहे तक्रारीनुसार आरोपीवर 294 504, 506 ,509, या कलम लावण्यात आला आणि आरोपी सध्या तरी मोकाटच आहे. त्यामुळे त्यांची हिंमत पूर्णपणे खसून गेली आहे. त्यांनी न्याय मिळावा याकरिता दि.5 मार्च रोजी भीम आर्मी कार्यालय गाठून विदर्भ प्रमुख अंकुश भाऊ कोचे व त्यांच्या टीम यांच्याशी संपर्क साधला लेखी अर्ज सुद्धा कार्यालयाला दिला.

त्यावेळेस उपस्थित सरपंच सुचिता जाधव, अनिता डुकरे, रोशना दहाट, विद्याबाई पाचरे, अजय जाधव, नरेश जाधव ,अनुप जाधव, गजानन उघडे, होते झालेल्या अन्यायास भीम आर्मी भारत एकता मिशन संघटने द्वारा आम्हाला न्याय मिळवून संघटनेमार्फत लढा देऊन होणाऱ्या अत्याचारास आळा घालण्यात यावा यासाठी त्यांनी मदत मागितली. विशेष म्हणजे समोर धुलीवंदनाचा सण आहे आणि आरोपी मोकाट असल्याने सरपंच आणि सदस्य गण यांच्याकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये पुलगाव पोलीस द्वारा लवकरात लवकर संबंधित तक्रारीचा चौकशी करून आरोपीला पकडून त्याच्यावर कारवाई करायला हवी अन्यथा एखादा अनर्थ झाल्यास त्याला जबाबदार कोण ? भीम आर्मी कार्यालय द्वारे महिला आयोग यांना सुद्धा तक्रार केली आहे व संबंधित तक्रारीचा पाठपुरावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना अर्ज सुद्धा पाठविले आहे भीम आर्मी महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे भारत देशामध्ये महिलांचा मान सन्मान केल्या जाते परंतु काही गावाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आज पण महिलांवर अन्याय अत्याचार दिवसांनी दिवस वाडीत चाललेला आहे संबंधित प्रकारामध्ये पोलीस प्रशासनाने वेळे प्रसंगी लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा त्या महिला सोबत काही अनर्थ झाल्यास नंतर कारवाईला काय अर्थ असा देखील प्रश्न ग्रामस्थ यांच्या मनात उद्भवत आहे समोरची परिस्थिती पाहून सरपंच महिलेला सुरक्षा देण्यात यावे
मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी अमित शहाचा सांगली मध्ये निदर्शने करून कऱण्यात आला निषेध.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

23 hours ago

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा राजुऱ्यात काँग्रेसकडून निषेध.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

23 hours ago