✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शहरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ड्रग्ज विक्री प्रकरणी आरोपीला अटक केली. त्यामुळे वर्धा जिल्हा ड्रग्जची विक्री होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वर्धा शहरात आनंदनगर परिसरा मध्ये ड्रग्ज (एमडी) सोबत पोलिसांनी दोघाना अटक केली. पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 8 मार्च पर्यंत तक पीसीआर देण्यात आला. या ड्रग्ज प्रकरणी अनेक नाव समोर येण्याची शक्यता दिसून येत आहे.
शनिवारला 3 वाजता आनंदनगर परिसरामध्ये दोघींना गिरफ्तार केले. यात इतवारा बाजार निवासी सौफियान कैसरुद्दीन शेख वय २२ वर्ष आणि तिचा साथी मुन्ना उर्फ राजन थुल याचा समावेश आहे. पुलिसाला मिळालेल्या सूचनेनुसार एक व्यक्ति बाइकने आनंदनगरी येथे एमडी ड्रग्स सप्लाई करत आहे, तेव्हा पोलीस आनंद नगर परिसरात तपासणीसाठी गेले असता, एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याची कोठडीत चौकशी केली असता त्याने आपले नाव सुफियान शेख सांगितले.
त्याच्या शोधात त्याच्या पँटच्या खिशात प्लास्टिकच्या पाकिटात तिखट वास असलेली पांढरी रंगाची पावडर आढळून आली. हे एमडी ड्रग्ज असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी शेख व त्याचा साथीदार थूल यांना अटक केली. 9.20 ग्रॅम एमडी ड्रग्ज, तीन मोबाईलसह एक लाख 13 हजार रुपयांचा माल जप्त केला.
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…