मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू! संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ.

रूपसेन उमराणी मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई:-
स्वतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला महाराष्ट्रात एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाचे नेते व शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज सकाळी अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झालाय अपघात इतका भीषण होता की गाडी पार चकणाचुर झाली.

आज मराठा समन्वय समितीची दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्या आधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. मराठा आरक्षणाचा विनायक मेटे म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज… सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे… मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विनायक मेटे… मराठा समाजाच्या आंदोलनांचा चेहरा. अश्या या नेत्याच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळलाय.

आज मराठा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पुण्याहून ते मुंबईला येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात जखमी झाल्यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही. जवळपास एक तासाहून अधिककाळ त्यांना मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागली. उपचारांना उशीर झाल्याने त्यांना जीवाला मुकावं लागल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलाय.

ब्रेनस्टेम इंजरीमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज
विनायक मेटे यांना 6.20 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. पल्स नव्हते. बीपीही नव्हता ईसीजीमध्ये फ्लॅट लाईन दिसून आली होती. त्यांना आणलं तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता.ऑन द स्पॉट मृत्यू झाला, असं म्हणणं घाईचं ठरेल. पाच वाजून पाच मिनिटांनी अपघात झाला. पोलिसांना लिव्हर,छाती आणि डोक्यात मार लागला होता. ब्रेनस्टेम इंजरीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. पोस्टमॉर्टेमनंतर सविस्तर कळेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

भीषण कार अपघात
विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

16 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

18 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago