नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील नवीन कोपरी पुलाखालून वागळे इस्टेटला जोडणारा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच केली. ज्ञानसाधना महाविद्यालयासमोर नाला वळविण्याचे काम व प्रस्तावित रस्ता विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या ठिकाणी सुरू असलेले नाला वळविण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या कशा पध्दतीने पूर्ण केले जाणार आहे या बाबी आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून समजून घेतल्या. सदरचे काम हे १५ मार्चपर्यत पूर्ण होईल या दृष्टीने कामाचा वेग वाढवावा, याचे कारण या ठिकाणी नव्याने बनविण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम एमएमआरडीई करणार आहे, नाल्याचे काम जर महापालिकेने १५ मार्चपर्यत पूर्ण केले तर पुढील काम एमएमआरडीए ३१ मे पर्यत पूर्ण करेल याची जाणीव करुन देत सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या. तसेच हे काम तीन शिफ्टमध्ये २४ तास काम सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच याबाबत एमएमआरडीएकडे पाठपुरावा सुरू ठेवावा जेणेकरुन ३१ मे पर्यत प्रस्तावित रस्त्याचे काम पूर्ण होईल असेही आयुक्तांनी नमूद केले.
कोपरी पूर्वेला जोडणारा नवीन पूल तयार झाल्यावर तीन हात नाक्यावरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. कोपरी, ठाणे स्टेशन, गोखले रोड या परिसरातील नागरिकांना वागळे इस्टेटकडे जाण्यासाठी सदर रस्त्याचा वापर करणे सोईचे होणार आहे. त्याचबरोबर ज्ञानसाधना महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत तीन हात नाक्यावरुन यावे लागते परंतु सदर काम पूर्ण झाल्यावर या पर्यायी रस्त्याचा वापर करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत तीन हात नाक्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी कमी होण्याबरोबरच वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
एलबीएस मार्गावरील टीप टॉप प्लाझा समोरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, या रस्त्याची पाहणी करत येथील अनावश्यक बॅरीगेटींग काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करावा व परिसरात बहुतांश ठिकाणी लोंबकळत असलेल्या विविध वायर्सबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या योग्य प्रकारे लावण्यात येतील या दृष्टीनेही कार्यवाही करावी व चौकांमध्ये लावण्यात आलेले जाहिरात फलक व बॅनर्स काढून चौक मोकळे व सुशोभित राहतील या दृष्टीने सातत्याने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मॉडेला पोलीस चौकीजवळील जागेत अस्ताव्यस्त टाकलेले सामान व डेब्रीज हटवून जागा स्वच्छ करण्यात यावी. या लगत असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंग होणाऱ्या वाहनांसंदर्भात योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त वाहने पार्क होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे व या ठिकाणी दोन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या पाहणी दौऱ्यादरम्यान इंदिरानगर व कामगार हॉस्पिटल येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली. इंदिरानगर नाका येथील कलव्हर्टचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावे, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे रस्त्याच्या मध्ये येत असलेले सार्वजनिक शौचालय हे रस्त्यापासून काही अंतर सोडून नव्याने बांधण्यात यावे जेणेकरुन येथील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. तसेच फूटपाथवर महावितरणच्या पडलेल्या वायर्स पडल्याचे निदर्शनास येताच संबंधितांशी चर्चा करुन सदरहू पाईप लाईन भुयारी करण्याबाबत कार्यवाही करावी.
त्याचप्रमाणे कामगार हॉस्पिटल नाका ते इंदिरा नगर नाक्यापर्यत संपूर्ण रस्त्याची पाहणी करुन अर्धवट अवस्थेत असलेल्या नाल्याचे काम पूर्ण करावे तसेच रस्त्याचे काम फूटपाथपर्यत सलग करण्याच्या सूचना दिल्या. रोड नं. २२ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अत्याधुनिक पध्दतीने तयार करण्यात आलेल्या व अद्ययावत सोई असलेल्या या शौचालयाचा वापर सुरू झाल्यानंतर त्याची स्वच्छता राखली जाईल या दृष्टीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले.
इंदिरानगर नाक्यापासून कामगार रुग्णालय ते नितिन कंपनी हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरील रस्त्याच्या एका लेनचे काम अद्याप झालेले नाही, हे काम त्वरीत सुरू करुन ते ३१ मार्चपर्यंत संपवावे अशा सूचना दिल्या.
मशीन होलची झाकणे सुस्थितीत असावी: काही ठिकाणी रस्त्यावरील मशीनहोलची झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले, पावसाळ्याच्या तोंडावर ही सर्व कामे पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असून कोणत्याही परिस्थिती दुर्घटना घडणार नाही या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचनाही आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या.
कार्यकारी अभियंत्यांना सूचना: रोड नं ३३ येथे १६ झेड जेथे सुरू होतो त्या ठिकाणी एका बाजूला रस्ता पूर्ण केला आहे, परंतु रस्ता आणि फूटपाथ यामध्ये फरक पडला असून रस्ता उंच झाला असून फूटपाथ खाली गेला आहे. ज्यावेळी रस्ता तयार झाला त्याचवेळी फूटपाथ सुद्धा रस्त्याच्या उंचीप्रमाणे बांधून घेणे गरजेचे होते अशी वेगवेगळी कामे काढल्यामुळे नागरिकांना फार मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागते, आणि कामेही सातत्याने सुरू राहतात त्यामुळे ज्या ठिकाणी काम सुरू आहे तो परिसर विस्कळीत दिसतो. ही बाब कार्यकारी अभियंता व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी न पाहिल्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कोणत्याही कामाचे प्लॅनिंग करताना एका बाजूच्या भिंतीपासून दुसऱ्या बाजूच्या भिंतीपर्यत (Edge to Edge) फूटपाथ आणि भिंत यांचे एकत्र नियोजन करुन एकत्र अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…