डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- वाकड पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी या चोरट्याकडून ०१ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करून दुचाकी चोरीचे ०४गुन्हे उघडकीस आणले आहेत. दादासाहेब उर्फ अनिकेत बाळू निकाळजे वय २६ वर्ष रा. इंदिरानगर झोपडपट्टी सुकटा, ता,भूम जि. उस्मानाबाद असे अटक केलेल्या सराईत दुचाकी चोरटयाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी तपास पथकाला दुचाकी चोऱ्यांचे गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथक दुचाकी चोरट्याची माहिती घेऊन तपास करीत असताना पथकातील पोलीस शिपाई स्वप्निल लोखंडे यांना माहिती मिळाली की ,एक इसम चोरलेली दुचाकी विक्रीकरिता काळेवाडी येथील पाचपीर चौकात येणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस शिपाई लोखंडे यांनी सापळा रचला. थोड्यावेळाने एक इसम दुचाकी घेऊन पाचपीर चौकात येवून थांबला. त्याची हालचाल सशंस्यास्पद वाटल्याने पोलीस शिपाई लोखंडे यांनी पोलीस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला नाव पत्ता विचारलं असतं त्याने त्याचे नाव दादासाहेब उर्फ अनिकेत बाळू निकाळजे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातील यामाहा (एम एच १४,एफझेड ७७०३) या दुचाकीबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्यास पोलीस स्टेशन येथे आणून विश्वासात घेऊन दुचाकी बाबत चौकशी केली असता ही यमाहा दुचाकी चोरी केली असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
वाकड पोलिसांनी अधिक तपास केला असता दादासाहेब उर्फ अनिकेत बाळू निकाळजे हा सराईत दुचाकी चोरटा असल्याचे माहिती पोलीस कडे प्राप्त झाली पोलीसांनी त्याच्याकडून ०१लाख , ८५हजार किमतीच्या ०४ दुचाकी जप्त करून चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे ,सह आयुक्त मनोज कुमार लोहिया अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे ,पोलीस उपयुक्त डॉ. काकासाहेब डोळे ,साहयक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र गाडगे ,सहाय्य पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस हवालदार आतिश जाधव, पोलीस नाईक प्रशांत गिलबिले, पोलीस शिपाई स्वप्निल लोखंडे, शिपाई विनायक घारगे, कौतय खराडे, पोलीस कॉन्स्टेबल अजय फल्ले, पोलीस शिपाई तात्या शिंदे, भास्कर भारती यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शहर आणि उपनगर येथे…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…