दोन महिन्यानंतर खुनाच्या गुन्हयाला फुटली वाचा”, गुन्हे शाखा युनिट-२ कडुन खुनाच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०७/०३/२०२३ रोजी युनिट-2 कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार युनिट-२ हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. फरासखाना पोलीस अकस्मात मयत क्रं. १३९/२०२२ सीआरपीसी १७४ मधील बेवारस मयत इसमाचा अकस्मात मृत्यु झालेला नसुन त्यास दोन इसमांनी लाथाबुक्याने मारहाण करुन त्याचा खुन केला आहे. त्यास मारहाण करणारे इसम नामे सिध्दार्थ बनसोडे व शशी चारण हे सध्या श्रमिक नगर, मंगळवार पेठ येथे सार्वजनीक रोडवर उभे आहे अशी खात्रीशीर बातमी प्राप्त होताच सदर बातमीचे गांभीर्य लक्षात घेवुन युनिट-२ प्रभारी श्री क्रांतीकुमार पाटील यांनी म. सहा. पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पो.हवा. १४४७ चव्हाण, पो.हवा. २५७२ जाधव, पो.हवा. २४६ तारु, म.पो.हवा. ५९६२ ताम्हाणे, पो.शि.८४०३ गजानन सोनुने व पो.ना. ७४०० राख अशी टिम तयार करुन त्यांना योग्य सुचना व मार्गदर्शन करून, कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, टिम मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक ०७/०३/२०२३ रोजी २२/०० वाजता इसम नामे १) सिध्दार्थ अनिल बनसोडे वय २२ वर्षे, रा. २२६ मंगळवार पेठ, जुना बाजार पुणे २) शशी सुरेश चारण वय २९ वर्षे, रा. १६८ मंगळवार पेठ, श्रमिक नगर पुणे यांना ताब्यात घेवुन गुन्हे शाखा युनिट-२ येथील कार्यालय येथे घेवून आल्या नंतर त्यांना युनिट-२ प्रभारी तसेच फरासखाना पोलीस स्टेशन येथील पो.निरी. (गुन्हे) श्री. मंगेश जगताप, पो.उप निरी. जयसिंग श्रीमंत दाढे व पो. हवा. २९१३ काकडे सखोल तपास केला असता, त्यांनी दि.२८/१२/२०२२ रोजी ०२:०० बा चे सुमारास ताब्यातील संशयीत आरोपी व त्यांचे मित्र नामे ऋतिक भुपेश मुलताणी व धनवंत सुरेंद्र हस्ते यांचेसह विर गोगादेव चौक त्रिवेणी शांतीमठ मंगळवार पेठ पुणे येथे गप्पा मारत थांबले असतांना मयत अनोळखी इसमाने शिवीगाळ केल्याचे कारणावरुन सिध्दार्थ अनिल बनसोडे व शशी सुरेश चारण यांनी मयत अनोळखी इसमांस लाथाबुक्याने जबर मारहाण करीत त्याचे छातीत लाथ मारल्यामुळे तो जागीच मयत झाल्याचे त्यांना समजल्याने कोणाला काहीएक न सांगता घाबरुन आप-आपले घरी निघुन गेले असे सांगीतले.

सदर हकीकत वरुन फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९/२०२३ भा.द.वि. कलम ३०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून निष्पन्न आरोपी नामे १) सिध्दार्थ अनिल बनसोडे वय २२ वर्षे, रा. २२६ मंगळवार पेठ, जुना बाजार पुणे २) शशी सुरेश चारण वय २९ वर्षे, रा. १६८ मंगळवार पेठ, श्रमिक नगर पुणे यांना अटक करुन पुढील तपास फरासखाना पोलीस स्टेशन कडील अधिकारी करीत आहेत.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, श्री. अमोल झेंडे, सहा. पो. आयुक्त गुन्हे -१ श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली व मा. पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट-२ पुणे शहर. म. सहा.पो.नि. वैशाली भोसले, पो.उप-नि. नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, पोलीस अमलदार गजानन सोनुने, विनोद चव्हाण, संजय जाधव, साधना ताम्हाणे, उत्तम तारु, निखील जाधव, कादीर शेख, समिर पटेल, मोहसीन शेख, नागनाथ राख, पुष्पेंद्र चव्हाण, शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, गणेश थोरात, प्रमोद कोकणे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

13 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago