वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका सासूने शुल्लक कारणावरून आपल्या सुनेची डोकं जमिनीवर आपटून दुर्दैवीरित्या हत्या केली. ही घटना समोर येताच सर्वत्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चालताना पाय लागल्याच्या कारणाने सूनेने सासूला शिवीगाळ केली. त्या रागातून तिला मारहाण करुन फरशीवर पडलेल्या सूनेचे सासूने केस धरुन डोके जमिनीवर आपटून तिची हत्या केली. पोलिसांनी सासूला अटक केली आहे. कमला प्रभुलाल माळवी वय 49 वर्ष, रा. कलवड वस्ती, लोहगाव असे सुनेची हत्या केलेल्या सासूचे नाव आहे. तर रितु रवींद्र माळवी वय 28 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समु रामकिशोर चौधरी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद गु. रजि. नं. 127/23 तक्रार दिली आहे. ही घटना लोहगाव मधील कलवड वस्तीत 6 मार्च रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माळवी आणि रितु यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या लग्नाला सासू कमला माळवी हिचा कायम विरोध होता. रितू, रवींद्र यांना एक मुलगाही आहे. लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतरही कमला यांचा विरोध कमी झाला नाही. त्यावरुन त्या नेहमी सासू सुनेशी भांडणे करीत असत. घरकाम, स्वयंपाक व नातवाला व्यवस्थित सांभाळत नाही, म्हणून त्या कायम सुनेला बोलत असत. 6 मार्च रोजी पहाटे चहा करण्यासाठी सासू बेडरुममध्ये ठेवलेल्या फ्रिज उघडत असताना त्यांचा पाय सुनेला लागला. त्यावरुन सुनेने त्यांना शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने सासुनेही तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यात रितु खाली फरशीवर पडल्या. तेव्हा सासुने तिचे केस धरुन डोके जमिनीवर आपटले. त्यात रितु हिचा मृत्यु झाला. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनात डॉक्टरांनी डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यु झाल्याचा अहवाल दिला.
झोपेत असताना सुन कॉटवरुन पडल्याने तिच्या डोक्याला लागून तिचा मृत्यु झाल्याचे सासु सांगत होती. मात्र, ते सांगताना ती गडबडल्याने पोलिसांना संशय आला. तिच्याविषयी माहिती घेतल्यावर दोघींची नेहमी भांडणे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सासुकडे वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली. त्यानंतर तिने आपणच फरशीवर तिचे डोके आपटल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…