सांगलीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार आंदोलन.

✒️उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली दि ८:- गेली अनेक वर्ष देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येप्रमाणे शासकीय नोकर भरती केली नाही. जनतेला रोजगार उपलब्ध करुन दिला नाही. तसेच महागाईचा डोंगर जनतेच्या डोक्यावर ठेवणे चालूच आहे. त्यामुळे लोकांनी काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले व भाजपाने त्या काळा मध्ये मोठ मोठी आश्वासने दिले होते. परंतु भाजपाने देश विकावयास काढला आहे. लोकांना लोकसंख्ये प्रमाणे नोकर भरती नाही. भांडवल शहाना खाजगीकरणाच्या नावाखाली सावकार करुन इथल्या शासकीय नोकऱ्या संपविणेचे काम भाजप सरकार करीत आहे. तसेच विज दरवाढ जिवनावश्यक वस्तुची झालेली दरवाढ, गॅसदर वाढ, पेट्रोल दरवाढ त्यामुळे भारतातील जनता होरपळून निघत आहे. पेट्रोलचे दर १०७ रू. लिटर तर गॅसचा दर ११२० रुपयांना मिळत आहे. आम्ही महागाई कमी करु व गोर गरीब जनतेला न्याय देणेचा प्रयत्न करु असे आश्वासन देवून गोरगरीब जनतेची फसवणूक करुन गोरगरीब भाबड्या मतदारांनी महागाई कमी होईल असे समजुन भारतीय जनता पार्टीला भरघोस मते दिली मात्र गेली १० वर्षे हे सरकार सत्तेवर असुन काँग्रेसच्या काळात जेवढी महागाई होती त्या पेक्षा दुप्पट, तिप्पट महागाई भारतीय जनता पार्टीच्या राज्यात झालेली आहे. तरी लवकरात लवकर महागाई नियंत्रणात आणून जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत व सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे यांनी केली.

यावेळी जिल्हासचिव राजू मुलानी, रहिमभाई कवठेकर, चंद्रकांत खरात, सतिश शिकलगार, अनिल अंकलखोपे, नाझिर झारी, सिद्धार्थ लोंढे, आम्रपाली लोंढे, प्रमोद मल्लाडे, अतिश कांबळे, मिलिंद कांबळे, सागर आठवले, विशाल लोंढे, सूरज वाघमारे, दिपक कांबळे, मानतेश कांबळे, किशोर आढाव, आनंदसागर पुजारी, महेश कुरणे, अमोल साबळे, वहिदा कडलास्कर, यासीन कडलास्कर, चंद्रकांत कोलप, दत्ता आठवले, भाऊसाहेब कोळी, राजू बेग, जमीर जामदार, राहुल धोतरे, धम्मदिप कांबळे, महावीर पाटील, गौतम लोटे, संतोष कांबळे, आकाश जाधव इ. बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

1 day ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 days ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago