पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०७/०३/२०२३ रोजी होळी धुलीवंदन सणानिमीत्त भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अमलदार हे मा. वरीष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पेट्रोलींग करीत असताना पोलीस अमलदार राहुल तांबे, धनाजी धोत्रे याना जांभुळवाडी दरी पुलाचे खालील बाजुने एक इसम त्याचे कमरेला पिस्टल लावुन फिरत आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अमलदार हे जाभुळवाडी दरीपुलाचे खालील बाजुचे रोडने हायवेकडे जाणारे रोडवर इसम नामे ओंकार झुगजी खेगाळे, वय २३ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ए९/१०१, इको व्हॅली. कान्हे फाटा, वडगाळ मावळ, पुणे मुळ गाव करंजगाव, ता. मावळ, जि. पुणे हा त्याचे ताब्यात एक ३५,०००/- रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व ६००/- रुपये किंमतीचे ३ जिवंत काडतुस मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा सुनिल पवार साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अमलदार राहुल ताबे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, सचिन गाडे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, याच्या पथकाने केली आहे.
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…
उषाताई कांबळे, सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- दिनांक 23 डिसेंबर रोजी पारिघा…
जिल्हाधिकारी नागपूर यांना उपविभागीय अधिकारी सावनेर मार्फत निवेदन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश…
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २५ डिसेंबर:- सावनेर भाजपा…