मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- उपविभागीय अंतर्गत येत असलेल्या उपपोलीस स्टेशन राजाराम येते आज दिनांक 08 मार्च रोजी उप पोलीस स्टेशन राजाराम खां येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. यतीन देशमुख यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली “भव्य महिला” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर भव्य मेळाव्यामध्ये अध्यक्षा म्हणून अँड. रुपाली गेडाम मॅडम राजाराम खां हजर होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मनोज येलमुले वैद्यकीय अधिकारी कमलापूर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. आलाम मॅडम प्रतिष्ठीत नागरिक राजाराम श्री पूजलवार सर मुख्याध्यापक जी प शाळा मरनेली, राऊत सर शिक्षक राजाराम, मडावी साहेब पोलीस उपनिरीक्षक एस आर पी एफ हिंगोली व आम्ही पोउपनि कसबेवाड प्रभारी अधिकारी , पो उप नि जाधव सर्व जिल्हा पोलीस एसआरपीएफ चे अधिकारी आमलदर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व हद्दीतील 100 ते 150 नागरिक व 100 विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अँड. रुपाली गेडाम मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गुड टच व बॅड टच तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व महिलांना घमेले व साड्या देऊन शासनाच्या विविध योजना विषयी वेगवेगळी माहिती दिली व भोजन देऊन कार्यक्रम सांगता करण्यात आले आहे. या वेळी महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…