मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आरोग्य विभाग हा प्रत्येक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून या विभागांतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले. 8 मार्च बुधवार ला उपजिल्हा रुग्णालय,अहेरी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे येथील आरोग्य सेविकांचे सत्कार करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सौ आरती डुकरे,संध्या मुंगमोडे, मंगला गोबाडे, माया सुनतकर, शोभा मडावी, सुवर्णा सडमेक, निवेदिता विरगोनवार आदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना इतरांसारखे आरोग्य सेविकांना सुद्धा आपला संसार असतानाही घरदार सोडून 24 तास त्या रुग्णसेवा करतात. एवढेच नव्हेतर कोरोना काळातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या या योद्धा साक्षात दुर्गा मातेचा अवतार आहेत. या कठीण काळात जनतेची सेवा करणाऱ्या या आरोग्यसेविकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. देवळात फक्त देवीची मूर्ती बंदिस्त होती. पण आरोग्य सेविकांच्या रुपाने देव आपल्या भक्तांना मदत करीत होते. कोरोनामुळे संपूर्ण देश भयभीत झाला होता. अशावेळी सर्व नागरिक लॉकडाऊन मध्ये घरात बसले होते. परंतु आपल्या या भगिनी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासून कोरोना बाधितांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या कुटुंबीयांना कोरोंटाईन, त्यांना योग्य सल्ला देणे समाजात जनजागृती करणे असे महान कार्य केले आहेत. त्यामुळे आरोग्य सेविकांचा आजच्या दिवशी सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महिला डॉक्टरांचाही शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान.
उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील अहोरात्र रुग्णांची सेवा करणारे महिला डॉक्टर तसेच आरोग्य सेविका दर्या राऊत, करिश्मा चिडे, कविता सडमेक, वंशीका वेलादी, कुमारी विनायक, संगीता टेकाम, ज्योत्स्ना जुनघरे, लक्ष्मी दुर्गे, कुंदा मुंगमाळे, रोहिणी आरेवार, रोशनी दुर्गे आदी आरोग्य सेविकांचा सन्मान करण्यात आला.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…