विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न.
संतोष मेश्राम चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 8 मार्च:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट व जिजामाता गाईड युनिटच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन कार्यक्रम व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव येसेकर, सचिव, बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सतीश धोटे, अध्यक्ष,बा. शि. प्र. मं. राजुरा, मधुकर जाणवे, संचालक, अविनाश निवलकर, संचालक, सत्कारमूर्ती करुणा गावंडे – जांभुळकर, जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर्वी येथील शिक्षिका , वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ. प्रियंका डुकरे, , लता मडावी, परिचरिका, उप जिल्हा रुग्णालय, राजुरा, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर , पर्यवेक्षक तथा छत्रपती स्काऊट युनिट लीडर बादल बेले, ज्येष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चंद्रपूर बारस स्काऊट आणि गाईड ही एक शैक्षणिक संस्था असून याद्वारे स्काऊट गाईड विद्यार्थ्यांमध्ये नीतिमत्ता स्वयंशिस्त वक्तशीरपणा नेतृत्व अशा अनेक मूल्यांची जोपासना व्हावी या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमाचे आयोजन करते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गाईड पथकाकरिता विविध क्षेत्रातील महिला तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान, कायदेविषयक, शैक्षणिक मार्गदर्शन व त्यांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमाच्या आयोजनांचे शालेय स्तरावर आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय स्तरावरील विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण सुद्धा घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजामाता गाईड युनिट प्रमुख रोशनी कांबळे यांनी केले. तर प्रास्ताविक नलिनी पिंगे यांनी केले व आभार ज्योती कल्लूरवार यांनी मानले. सहाय्यक शिक्षिका वैशाली टिपले यांनी स्वरचित कविता गायन केले. तर विध्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता सातविच्या विद्यार्थिनींनी लक्षवेधी नृत्य सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली.व जागतिक महिला दिनाचे महत्व विषद केले.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…