पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमधील विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल हरवले बाबत तक्रारी नोंद केलेल्या होत्या, सदर तक्रारींची दखल घेऊन हरवलेले मोबाईल फोन याचा शोध घेऊन ते हस्तगत करणेबाबतचे आदेश मा वपोनि गजानन पवार सो यांनी लोणीकंद सायबर तपास पथकास दिलेले होते त्यावरून लोणीकंद सायबर तपास पथकाने हरवलेले मोबाईलबाबत अधिकची माहीती प्राप्त करुन तसेच तांत्रिक विश्लेषण करून विविध भागातुन एकुण २१ अॅप्पल, सॅमसंग, वन प्लस, व्हियो, ओप्पो, रिअल मी एम आय असे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हस्तगत केले व ते तक्रारदार यांना मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०४ शशिकांत बोराटे सो यांचे हस्ते सुपूर्त केले. तक्रारदारांनी लोणीकंद सायबर तपास पथक यांचे आभार मानले..
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ -०४ श्री. शशिकांत बोराटे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री किशोर जाधव सो, लोणीकंद पोलीस स्टेशन मा. वपोनि श्री गजानन पवार सो, पोनि गुन्हे श्री मारुती पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोस्टे सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस अमलदार समीर पिलाणे, सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांनी केलेली आहे.
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शहर आणि उपनगर येथे…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…