पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत येणा-या हांडेवाडी भागातील पायी चालणा-या इसमाचे मोबाईल हिसकाविण्याची घटना घडली होती. त्याअनुषंगाने कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपी याचा शोध घेण्याबाबत व गुन्हयास प्रतिबंध करण्याबाबत मा. रितेशकुमार सो पोलीस आयुक्त, मा. संदिप कर्णिक सो, सह पोलीस आयुक्त, विक्रांत देखमुख, पोलीस उप आयुक्त सो परि०५ श्रीमती पौर्णिमा तावरे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे तपासपथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, तपास पथक अंमलदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मरगळे, असे शोध घेत होतो. दि. २७/०२/२०२३ रोजी सायंकाळी वरिल स्टाफच्या टिम तयार करून ठंड्रो, महमदवाडी भागात पेट्रोलिंग करित होतो. पेट्रोलिंग करित असताना पोलीस अंमलदार महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे यांना त्याच्या बातमीदारामार्फतीने बातमी प्राप्त झाली की, फेब्रुवारी महिन्यामध्ये हांडे लॉन्स येथे पायी जाणा-या इसमाला तीन इसमांनी त्याच्याकडील करिझ्मा मोटार सायकल वरुन येवुन त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरी करणारे इसम त्याच्या करिङमा मोटार सायकलवरुन दिल्ली पब्लिक स्कूलच्या जवळ अंधारात त्याची गाडी पार्क करुन थांबलेले आहेत. ते पुन्हा गुन्हा करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त बातमीच्या अनुषंगाने दिल्ली पब्लिक स्कूल येथून तीन जणांना ताब्यात घेवुन त्यांची नाव पत्ता १) उमर सलिम शेख, वय १९ वर्ष, रा. आदर्शनगर, तिरंगा चोक, उरळी देवाची, वैष्णवी सिटी, पुणे २)कदिर इकबाल शेख, वय १९ वर्षे, रा. वैष्णवी सिटीचे बाजुला, शिवाजी चौकाचे जवळ, पत्र्याचे घर उरुळी देवाची पुणे ३) विधीसंघर्षग्रस्तबालक प्रमाणे असल्याची सांगितले. त्यांना अंधारात का? थांबला होता याबाबत चौकशी करता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्याच्याबाबत संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मोबाईल हिसकाविल्याचा गुन्हा केल्याचे कबुल केले.
आरोपी यांना अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवून तपास करुन त्याची घरझडती घेतली असता त्यांच्या घरातुन जबरी चोरी केलेले एकुण १२ मोबाईल १,२३,०००/- रु कि जप्त करण्यात आले आहे. सदर मोबाईल मालकाचा शोध घेतला असता त्यांनीही त्याचे मोबाईल हिसकावून चोरी केल्याचे सांगितले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…