मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन
✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आरोग्य विगाभाच्यावतीने दि.21 मार्च पर्यंत जिल्ह्यातील अतिजोखीम भागात सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या पासुन क्षयरोगाची माहिती न लपविता सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर यांनी केले.
वर्धा आरोग्य विभागाच्यावतीने दि.8 ते 21 मार्च या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्याकरीता वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर व क्षयरोग पर्यवेक्षकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधुरी दिघेकर यांची उपस्थिती होती.
या शोध मोहिम कालावधीत जिल्ह्यात 26 हजार 672 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार असुन एकुण 67 तपासणी पथक व 14 पथक पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी वर्धा जिल्ह्यातील 1 लाख 33 हजार 358 इतक्या लोकसंख्येंची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा शोध घेऊन रोगांचे लक्ष आढणाऱ्या संशयित रुग्णांची मोफत एक्स-रे, थुंकी तपासणी जवळच्या दवाखान्यात करुन घेतली जातील. रोगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरीत मोफत औषधोपचार चालू करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी आरोग्य केंद्रस्तरावर काम करणाऱ्या आशा सेविका, क्षेत्रिय कर्मचारी, स्वयंसेवक, पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे पथक घरोघरी जाऊन भेटी देऊन आजाराविषयी माहिती तसेच मार्गदर्शन करणार आहेत.
घरातील प्रत्येक सदस्याची तपासणी करुन घरावर एल लिहून घराचा क्रमांक व तारीख नोंदविण्यात येणार आहे. घरातील एक किंवा सर्व व्यक्तींची तपासणी करावयाची राहिली तर एचएक्स, सदस्यांनी तपासणीस नकार दिल्यास एक्सआर, सर्वेच्यावेळी गैरहजर सदस्य परत येणार नसेल तर एक्सव्ही, घर कायमचे बंद असेल तर एक्सएल, अशी खून दर्शवून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत उपचारावर असणाऱ्या व पोषण आहार किट घेण्यासाठी संमती दर्शविलेल्या क्षयरुग्णांना निक्षय मित्रामार्फत पोषण आहार किटचे वाटप केले जाणार आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…