ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- अर्थसंकल्पातुन राज्य सरकारने जनतेला गाजर दाखवल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस च्या वतीने गाजर वाटून अनोखे आंदोलन केले.राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवले असून या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ पाचोरा येथे काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली गाजर वाटून आंदोलन करत अर्थसंकल्पाचा निषेध करण्यात आला. सर्व सामान्य नागरिकांसह लघु व्यावसायिकांना गाजर वाटून वेधले राज्य सरकारचे लक्ष.
शेतकरी महिला लघुउद्योग यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा राज्य सरकारने केली नसून अर्थसंकल्पातून जनतेला केवळ गाजर दाखवले आहे त्यामुळे जनतेला गाजर वाटून अर्थसंकल्पाचा निषेध करत काँग्रेस ने राज्य सरकाचे लक्ष वेधले आहे.
शिंदे – फडणवीस सरकार ने सद्यस्थितीत कपाशी महत्वपूर्ण विषय असतांना देखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही तर शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल असा कोणताही ठोस निर्णय घेतला नसुन सामान्य माणसाला गाजर देण्यात आले आहे त्यामुळे पाचोरा कॉंग्रेस ने शहरात नागरिकांना गाजर चे वाटप करुन अनोखे आंदोलन केले. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, सरचिटणीस प्रताप पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष इरफान मनियार, शहर अध्यक्ष शरीफ शेख, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे,तालुका अध्यक्ष कल्पेश येवले एस सी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, शहर उपाध्यक्ष अमजद मौलाना, शंकर सोनवणे, परवेज रसुल खान, रहीम शेख, शाहरुख खान, अमर खान, जुनेद खान, इम्रान देशमुख, जुनेद बागवान, सुनील पाटील, विजय गुजर, राजु गायकवाड, विनोद सुरवाडे आदी उपस्थित होते.
या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू होती. आंदोलनात शहरातील शेतकरी व सामान्य नागरिक गाजर घेऊन सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…