पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा पुणे शहर (युनिट १ व युनिट ६)
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिलेले आहेत. त्या अनुशंगाने पुणे शहरा मध्ये अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणा-या तसेच विक्री करणा-यांवर आळा बसावा तसेच त्या अनुषंगाने गुन्हे प्रतिबंध कारवाईसाठी हद्दीत पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग मोहीम राबवून कारवाई करणे बाबत वरिष्ठांनी आदेश दिलेले होते.
त्या अनुषंगाने युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस पथक हे हददीत गस्त करत असताना दि.२५/०२/२०२३ रोजी पोलीस पथकास पिस्टल विक्री करणारे दोन डिलर हे नानाश्री लॉज समोर वाघोली पुणे येथे आले असल्याची बातमी मिळाली त्याजनुशंगाने युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रजनिश निर्मल व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचला असता १) हनुमंत अशोक गोल्हार वय २४ वर्षे रा. मु.पो. जवळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर २) प्रदिप विष्णू गायकवाड वय २५ वर्षे रा. मु.पो. ढाकणवाडीता. पाथर्डी जि.अहमदनगर मुळ रा. नगररोड, चहाट फाटा, तालूका जिल्हा बीड असे महीद्रा कार मध्ये बसलेले असताना ताब्यात घेतले व गाडीची झडती घेतली असता गाडीत १ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळुन आले. सदर पिस्टल हे त्याने विक्री करता आणले असल्याचे सांगीतल्याने त्यांचेवर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
त्यांची पोलीस कस्टडी घेवून त्यांचेकडे अधिक तपास करता हनुमंत अशोक गोल्हार हा ए.पी.एम.सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. १२८/२०१७ नवी मुंबई येथील २.८ कोटी रुपयेचा दरोडा घातल्या प्रकरणी पाहीजे आरोपी असल्याचे तसेच भारती विदयापिठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ६५८/२०१९ आर्ग अॅक्ट प्रमाणे दाखल गुन्हयात पाहीजे आरोपी असल्याचे समजले, त्याचे कडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने अधिक तपास करता सदर अनधिकृत पिस्टल विक्री करणारे तसेच त्यांचेकडुन विकत घेणारे आरोपी ३) अरविंद श्रीराम पोटफोडे वय ३८ वर्षे, रा. अमरापुरता शेवगाव जि. अहमदनगर ४) शुभम विश्वनाथ गरजे वय २५ वर्षे रा.मु.पो. बडुले ता.नेवास जि. अहमदनगर ५) ऋषिकेश सुधाकर वाघ वय २५ वर्षे रा. मु.पो. सोनई ता.नेवासा जि.अहमदनगर ६) अमोल भाऊसाहेब शिंदे वय २५ वर्षे रा.मु.पो.खडले परमानंद ता.नेवासा जि. अहमदनगर यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपी यांचे कडुन वेगवेगळ्या ठिकाणी छापा करवाई करून एकुण १३ गावठी बनावटीचे पिस्टल ४ जिवंत काडतुसे तसेच एक महीद्रा कार मोबाईल असे एकुण २१,३२,०००/- रुपये किमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याप्रमाणेच युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे हददीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना चाररोड सिंचन भुवन समोर एक इसम उभा असून त्याचेकडे अनधिकृत पिस्टल असल्याचे समजल्याने त्यांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपीस पकडुन त्याची झडती घेतली असता त्यांनी आपले नांव साहील तुळशीराम चांदेरे उर्फ आतंक वय २१ वर्ष रा वरची आळी, बालमित्र मंडळाजवळ, सुसगाव, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे निळे रंगाचे सँगमध्ये कि रु ६०,०००/- ची एक देशी बनावटीची पिस्टल व किं रु २,०००/- चे दोन जिवंत काडतुसे मिळून आल्याने सदरबाबत समर्थ पो स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्यांनी तो कामास असलेल्या व्यंकटेशपार्क, को ऑप सोसायटीसमोर, सुतारवाडी, लिंकरोड, पाषाण, पुणे येथील ऑटो कस्टम स्टुडीओ टु व्हिलर नावाचे गॅरेजमध्ये आणखी तिन पिस्टल व काही जिवंत काडतुसे लपवून ठेवली असल्याचे सांगीतल्याने सदर ठिकाणी आरोपीसह जावून तेथून ०३ देशी बनावटीच्या पिस्टल व ०७ जिवंत काडतुस ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यात कि.रू.२,४९,०००/- चे असे एकुण ०४ पिस्टल व ०९ जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील प्रमाणे गुन्हे शाखे कडुन कारवाई करून ७ आरोपी यांचेकडुन एकुण १७ गावठी बनावटीचे पिस्टल १३ जिवंत काडतुसे तसेच एक महींद्रा कार मोबाईल असा मिळुन एकुण २३,८५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. सुनिल पवार, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे- २. श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर श्री रजनिश निर्मल वरीष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट १ श्री संदीप भोसले पोलीस सहा पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक अजय जाधव, सुनिल कुलकर्णी उप-निरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पो. अंमलदार, मच्छिंद्र बाळके, विठतल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, नितीन मुंडे मोहीते, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, नितीन धाडगे अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर, अमोल पवार, इम्रान शेख, आण्णा माने, आय्याज दडीकर, महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, निलेश साबळे, शुभम देसाई दत्ता सोनवणे यांनी केली आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…