पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
वाकड पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वाकड पोलीस ठाणे मनुष्य मिसींग रजि. नं. १३५/२०२० मधील तक्रारदार नामे शेषराव रंगनाथ अंगरख यांनी त्यांचा बेपत्ता मुलगा नामे संतोष शेषराव अंगरख वय ४२ वर्षे हा घरी परत ना आलेने फिर्यादीचे फिर्यादीवरुन वरील प्रमाणे मिसींग दाखल करण्यात आली होती. यातील अपहृत इसमाचा शोध घेत असताना, त्यास इसम नामे गणेश पवार व त्याचे दोन साथीदार यांनी संतोष शेषराव अंगरख याने गणेश पवार याचेकडुन व्यवसायाकरीता घेतलेले पैसे परत देत नसल्याचे कारणावरुन त्याचा खून करण्याचे इरादयाने त्यास जबरदस्तीने त्यांचे गाडीमध्ये नेवुन त्याचे जीवाचे बरेवाईट केले असण्याची शक्यता फिर्यादी यांनी वर्तविली होती. त्यावरून फिर्यादी यानी गणेश पवार व त्याचे दोन साथीदार यांचेविरुध्द कायदेशीर तक्रार दिल्याने वाकड पोस्टे गु र नं ५९१ / २०२० मादंवि कलम ३६३, ३६४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचे तपासामध्ये यातील आरोपींनी संगनमत करून यातील अपहृत इसमाचा त्याचे साथीदार नामे प्रदीप व मंगेश याचे मदतीने त्यास रहाटणी येथून गाडीत घेवुन त्याला दि. १६/०८/२०२०/- रोजी कासारसाई येथे नेवुन त्याचे डोक्यात दगड व जेसीबीचे बकेटने डोक्यात मारून त्याचा खुन केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचे इरादयाने त्याची बॉडी तेथे पुरुन टाकली असल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच आरोपी हा सवर्ण जातीचा असुन फिर्यादी यांचे भाऊ नामे राकेश शेषराव अंगरख यांनी मयत हा अनुसुचित जातीचा असल्याबाबतचा जातीचा दाखला हजर केला होता, त्यामुळे दाखल गुन्हयास मादंवि कलम ३०२, २०१ व अनुसुचित जाती जमाती कायदा कलम १९८९ चे कलम ६. ३(२) (v), ३(२) (va) प्रमाणे गुन्हयास कलगवाढ करण्यात आली होती. त्यानंतर तपास करून यातील आरोपीत नामे १) गणेश सुभेदार पवार वय ३७ वर्षे रा. स्वामी समर्थ कॉलनी, तापकीरनगर, काळेवाडी, पुणे मुळगांव- मु. पो. वेल्हा ता. पुरंदर, जि. पुणे, यास दि. २) अरविंद ऊर्फ सोन्या गणेश घुगे वय २४ वर्ष रा. C/o संतोष सावंत, विजयनगर, काळेवाडी, पुणे, मुळगाव तालुका मुखेड, जिल्हा नदिड ३) मंगेश भागुजी जगताप वय ३९ वर्षे, धंदा नौकरी, रा. फ्लॅट नं. ३१, एस बिल्डींग, संगम हौसींग सोसायटी, चिंचवडगाव, पुणे. ४) संदिप ऊर्फ घुंगरु लालजी कुमार वय २१ वर्ष रा. मु. जनी पोष्ट रामापूर तालुका ज्ञानपूर, जिल्हा भदोही, उत्तरप्रदेश यांना यापुर्वीच अटक करण्यात आली होती. परंतु यातील जेसीबी ऑपरेटर व पाहिजे आरोपी नामे ५) प्रदिप कुमार लालजी वय २९ वर्ष धंदा ड्रायव्हर रा. कृष्णा कॉलनी, रुद्रपूर तालुका रुद्रपूर, जिल्हा उधमसिंहनगर, राज्य उत्तराखंड, मुळगाव, जाठी, पो.स्टे. ज्ञानपूर, पोष्ट रामापूर जिल्हा भदोही, उत्तरप्रदेश राज्य हा गुन्हा घडलेपासून अदयाप पर्यंत पसार झाला होता. त्याचा दोन वेळा त्याचे राहते गावी रा. जाठी, पो.स्टे. ज्ञानपुर, पोष्ट रामापूर जिल्हा भदोही, उत्तरप्रदेश राज्य येथे जाऊन शोध घेण्यात आला होता परंतु तो निळुन येत नव्हता. त्याचा शोध घेऊन त्यास दाखल गुन्हयात अटक करणे खुप महत्वाचे होते.
सदर गुन्हयाचे घटनेचे गार्भीय ओळखुन मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज कुमार लोहिया सो, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो. अपर पोलीस आयुक्त, मा. श्री काकासाहेब डोळे सो, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २, तसेच मा. श्रीकांत दिसले, सहा पोलीस आयुक्त वाकड विभाग, पिं चिं. यांनी एस बी माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना गुन्हा तात्काळ उघडकीस आणुन आरोपी अटक करणे बाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे एस बी माने यांनी वाकड पोस्टेकडील एक तपास पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या.
त्यानुसार आर. एम. मासाळ व त्यांचे पोलीस पथकातील पोलीस अंमलदार पोहवा ९३७ महाजन, पोहचा १३४३ खुटवड, पोहवा जावेद पठाण, पोशि खराडे, व सपाफी श्री जोशी यांनी सदर आरोपीचा मोबाईल नंबर प्राप्त करून घेऊन त्याचे लोकेशन व तांत्रीक पध्दतीने तपास करून त्यास रुद्रपुर पोलीस ठाणे, जि. उधमसिंहनगर राज्य उत्तराखंड येथील गिता इंडस्ट्रीजचे समोरून मोठया शिताफीने त्यास कसलाही संशय येऊ न देता ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याचेकडे तपास करता त्याने यातील मुख्य आरोपीतचे सांगणेवरून यातील मयत इसमाचा जेसीबी मशीने सहाययाने खुन करुन त्याची मयत बाँडी कासारसाई येथे खड्डा करून पुरुन टाकल्याचे सांगितले आहे..
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज कुमार लोहिया सो. पोलीस सह आयुक्त, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो. अपर पोलीस आयुक्त, मा. श्री काकासाहेब डोळे सो, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २, तसेच मा. श्रीकांत डिसले, सहा पोलीस आयुक्त वाकड विभाग, पिं चि व श्री एस बी माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली आर. एम. मासाळ, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार पोहचा ९३७ महाजन, पोहवा १३४३ खुटवड, पोहवा जावेद पठाण, पोशि खराडे व सपाफौ श्री जोशी यांनी यांनी मिळून केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…