पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ(7020794626)
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १०/ ०३ / २०२३ रोजी शिवजयंती उत्सव ( तिथीप्रमाणे) चे बंदोबस्ताच्या अनुषंगाने तपास पथकातील सहा. पोलिस निरिक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस हवालदार बशीर सय्यद आणि रणजित फडतरे असे पोलिस ठाणे हददीत कायदा व सुव्यवस्थेचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, पोलिस हवालदार बशीर सय्यद यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, “एक मुलगा हा त्याचेकडील मोबाईल विकण्यासाठी पानटपरीवर आला आहे. आणि त्याचेकडे मोबाईलची पावती मागितली असता, तो पावती नसलेचे सांगत आहे. त्याला बोलण्यात गुंतविलेले आहे. तुम्ही लवकर या आणि खात्री करा.” अशी माहिती दिलेनंतर सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळविली असता, त्यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्यानंतर तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस हवालदार बशीर सय्यद आणि रणजित फडतरे असे जंगली महाराज रोड, शिवाजीनगर पुणे येथे रवाना होवुन तेथे सापळा रचुन सदर ठिकाणी नमुद संशयित मुलास ताब्यात घेवून, विश्वासात घेवून माहीती घेतली असता त्याने त्याचे नाव यश रोहित पटेकर वय २१ वर्ष, रा. सर्व्हे नंबर २६, भिमज्योत नगर, बोपोडी पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेवुन त्याचेकडे चौकशी करता त्याने दिनाक १२ / १२ / २०२२ रोजी मध्यरात्री ०१/०० वाजण्याचे सुमारास संचेती चौक, शिवाजीनगर पुणे येथे फोनवर बोलत असलेल्या व्यक्तिच्या जवळ जावुन त्याला पत्ता विचारण्याचा बहाणा करुन त्याचे हातामधील त्याचा मोबाईल फोन हा जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेलेचे कबुल केले आहे.
सदर आरोपीकडुन दाखल गुन्हयातील फिर्यादीचा जबरीने चोरुन नेलेला मोबाईल फोन आणि गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण १,६५,०००/- किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा रजि. नं. ५७/२०२३ भादवि कलम ३९२ हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०१ पुणे शहर, मा. गजानन टोम्पे, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अंमलदार बशीर सय्यद, रणजित फडतरे, अविनाश भिवरे, प्रविण राजपुत, अतुल साठे, गणपत बालकोळी, शिवा कांबळे आणि आदेश चलवादी यांनी केलेली आहे.
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शहर आणि उपनगर येथे…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…