शिवसेना (शिंदे) पक्षा तर्फे विविध सामाजिक उपक्रमातून शिवजयंती (तिथीनुसार) उत्साहात साजरी.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शिवसेना हिंगणघाट-समुद्रपूर विधानसभा पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार व कार्य लक्षात घेता,वंदनीय बाळासाहेब यांचा २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या सिद्धांताची जोपासना करत, कर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा सामाजिक वारसा समोर चालवत सामाजिक उपक्रम राबवत अपंगांना व्हील चेअर वाटप, विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप,तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना जे दूरवर पायदळ शाळेत जातात त्यांच्याकरिता सायकल वाटप असे सामाजिक अभियान शिवसेनेच्या माध्यमातून महावीर भवन हिंगनघाट येथे आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गणेश निखार शिवसेना जिल्हाप्रमुख, उद्घाटक किशोर दिघे महामंत्री भारतीय जनता पार्टी वर्धा, प्रमुख अतिथी किशोर बोकडे उपजिल्हाप्रमुख वर्धा, निखिल सातपुते जिल्हाप्रमुख युवासेना वर्धा, विवेक ठाकरे त्याचप्रमाणे विशेष अतिथी म्हणून आशिष पर्बत शहर अध्यक्ष बीजेपी, अनिता मावळे शहराध्यक्ष महिला मोर्चा बीजेपी, छायाताई सातपुते माजी नगरसेवक, नलिनीताई सयाम माजी नगरसेवक, मुन्ना त्रिवेदी माजी शहर प्रमुख शिवसेना, राजुभाऊ माडेवार माजी उपशहरप्रमुख हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता रवी धोटे उपजिल्हा प्रमुख शिवसेना, महेश मुडे उपजिल्हा प्रमुख युवासेना, धनश्री शिरसागर महिला संघटिका, अमित गावंडे तालुकाप्रमुख हिंगणघाट, गिरधर ठवरी तालुकाप्रमुख समुद्रपूर, प्रफुल क्षिरसागर शहरप्रमुख, देवा शेंडे उपशहर प्रमुख, मनोज कोटकर उपशहर प्रमुख, चंद्रशेखर रोहणकर उपशहर प्रमुख, मुकेश चौधरी शहर संघटक, योगेश अतकर शहर विभाग प्रमुख, आतिष सातपुते शहर विभाग प्रमुख, अक्षय निकम युवासेना शहर प्रमुख, गणेश शिंगारे युवासेना उपशहर प्रमुख, संकेत भोयर युवासेना उपशहर प्रमुख, प्रशांत कंडे युवासेना उपशहर प्रमुख, विरुळकरजी, कैलाश येडे, खुरपुडेजी, गुमडेलवारजी तसेच समस्त शिवसैनिकांनी सहयोग व सहकार्य केले.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

1 hour ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

3 hours ago