भारतातील कोट्यावधी बहुजनांना खरे स्वातंत्र मिळाले आहे काय??

लेखक:- सुनील गायकवाड, पुणे
गेल्या आठवडय़ा पासून जसजसा 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन जवळ येत आहे, तस तसा अनेक बहुजनवादी व आंबेडकरी कार्यकर्ते नेते स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देत आहे. चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा द्यायला काहीच अडचण नाही. हरकत ही नाही पण, आपला भूतकाळ विसरून भटमान्य टिळक आणि भांडवलशाहीचे पोशिंदे गांधी, नेहरू आणि सध्याचे माजूरडे सत्ताधारी यांच्या स्वातंत्र्याचे गुणगान गात आहोत. हे विसरत आहे, म्हणजे-दुसरयाच्या लग्नात देहभान विसरुन नाच गाणे करण्यासारखेच आहे, ही आंबेडकरी आणि बहुजनांना लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण 15 ऑगस्टला देशाला फक्त भौगोलिक आणि राजकिय स्वातंत्र मिळाले. देश परकिय गुलामितून स्वकियांच्या गुलामित आला देशाला सामाजिक न्यायाचे व समतेचे स्वातंत्र कधीच मिळाले नाही. देश ब्रिटिशांच्या जोखडातुन मुक्त झाला , आणि मनुवादींच्या जोखडात बांधला गेला, बहुजनांची सत्ता काही आलीच नाही. बहजन कालही पारतंत्र्यात होते आणि आजही आहे. म्हणजे आपण उच्चभ्रूंच्या स्वतंत्राचे गुणगान गात आहोत, स्वतः ला उच्चभ्रूं समजणाऱ्यानी इंगजाच्या गुलाम गिरीतून मुक्त होण्यासाठी सुखदेव ,भगत सिंग, राजगुरू, अशा अनेक ज्ञात अज्ञात क्रांती कारकांची माथी भडकाऊन त्त्याचा वापर आपले राजकीय स्वतंत्र मिळवण्यासाठी केला आणि हे क्रांतिकारक फासावर जात असताना गांधीसह अनेक नेते तिकडे डोळे मिटून गप्प बसले होते. मुघल सम्राट बाबरने त्याच्या मृत्यू पत्रात लिहून ठेवले आहे. की भारतात राज्य करायचे असेल तर इथे खडकाळ प्रदेशात दुहीची बीजे पेरा.. ती उगवणारच – आणि दुसरे ब्राह्मणांना सत्तेत सहभागी करून घ्यावे, म्हणजे म्हणून मुघल राजवटीने 38% सत्तेत वाटा देऊन सुमारे 650 वर्षे खुशाल राज्य केले. म्हणून त्यांना विरोध केला नाही. किंवा झाला नाही उलट, इंग्रजांनी नंदकुमार देव या ब्राह्मण व्यक्तीला फाशी दिली. ब्राह्मण हत्या पाप आहे. (मनुस्मृतीनुसार) बहुजनांनी शिक्षण घेऊ नये (मनुस्मृतीनुसार) इंग्रजांनी शिक्षण सर्वांना खुले केले. बहुजनाच्या परीस्थितीचा आढावा घेण्यासाठी सायमन कमिशन नियुक्त केले गेले पण त्याला ही विरोध केला. मुघलांच्या काळातील 38% सत्तेत वाटा पुन्हा मिळावा व इंग्रजांनी तो नाकारला म्हणून इंग्रजांच्या विरोधात टिळक, गांधी आदींनी चलेजाव आंदोलन केले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेतच स्वराज्य म्हणजे उच्चभ्रूंचे राज्य हाच दूर्गंध येतो आहे.

ज्या प्रकारे मनुस्मृतीच्या विरोधात फुले शाहू आंबेडकर, पेरीयार नायकर, बिरसा मुंडा, आदी महापुरूष सुधारकांनी संघष॔ करून बहुजनांना जे काही हक्क मिळवून दिले आहे ते, राखण्यासाठी तोच संघष॔ आजही बहुजनांना करायचा आहे, करावा लागणार आहे.

स्वातंत्र्याच्या दुसर्‍याच दिवशी 16 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई आझाद मैदान वर मोर्चा काढून” ये आझादी एक झुठी है, यहां लुटोरो कि चांदी है, यहां देश कि जनता भुकी है, “असे ललकारत आंबेडकरी व बहुजनांना स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचे आवाहन केले म्हणून बहुजनांनी व आंबेडकरी कार्यकर्ते नेते यांनी मुठभर उच्चभ्रू भांडवलदार आणि आधुनिक सरंजामदार इनामदार यांच्या स्वातंत्रदिनाचे कोडकौतुक करून फक्त शुभेच्छा न देता आपल्या गुलामीची ही जाणीव करून दयावी. आजही समताधिष्टित समाज, न्याय, बंधुता सहिष्णुता, आपल्या महापुरूषांना अभिप्रेत असलेली सामाजिक व्यवस्था निर्माण झाली नाही , ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. करावे लागणार आहेत. भारताला स्वातंत्र मिळून स्वर्णमहोत्सवी वर्ष साजरे करित असताना, स्वातंत्र तर मिळाले ब्रिटीश गोरे गेले, युरेशियन गोरे आले आणि देश पुन्हा गुलाम झाला.

म्हणजेच काय तर भारत देश हा मध्य युगापासून कधीच स्वतंत्र नव्हता मुघल, डच, फ्रेंच, इंग्रज, पेशवे आदिंनी भारतावर आक्रमण करून राज्य केले. 1947 ला देशाला फक्त भौगोलिक आणि राजकिय स्वातंत्र मिळाले पण आज पर्यंत सामाजिक न्याय व सामाजिक स्वातंत्र मिळाले नाही, ही मोठी शोकांतिका सुवर्ण महोत्सवी वर्षातली आहे.

आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत ही पिण्यासाठी पाणी शोधावे लागते. देशाच्या प्रत्येक राज्यात दलित उपेक्षित स्त्रिया आणि पुरुषांना नागवले जात आहे. जमीन शेती वाडी हिरावून घेऊन बेघर केले जाते बेकरी, बेरोजगारी, भुकबळींनी, जनता त्रस्त आहे, अन्याय, अत्याचार तर आहेच, शिवाय जातियवाद, जातिय, आर्थिक, लैगिक, शोषण सुद्धा आहे, कष्टकरी उपाशी पोटी राबतोय, अन्न पाणी शिवाय मरतोय, आणि चोर, बदमाश, लुटेरे, भ्रष्टाचारी हे तुपाशी आहेत, देशाला सामाजिक स्वातंत्र अजून मिळाले नाही त्यासाठी दुसरे स्वातंत्र युद्ध लढण्यासाठी बहुजनांनी सदैव तयार राहिले पाहिजे.

“यह आझादी झुटी है,
यहां लुटोरोंकि चांदी है.”

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

3 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

3 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

4 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

4 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

5 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

5 hours ago