पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- तक्रारदार- पंकज राजकुमार अग्रवाल, रा- साईनाथनगर खराड़ी पुणे यांनी तक्रार दिली की आरोपी नामे रामलखन प्रजापती रा रायपुर छत्तीसगड याने तक्रादार यांचकडुन बिल्डींग बांधण्याकरीता लागणा-या स्टीलचे मटेरीयल करीता त्याचे लुसेंट स्टील प्रा. लि या फर्मचे नावे ऑर्डर घेवुन त्याकरीता ५०,००,०००/- रू ( पचास लाख रूपये) अॅडव्हान्स स्वरूपात घेवून तक्रादार यांना स्टील न देता तक्रारदार यांची फसवणुक केली म्हणुन चंदननगर पोलीस स्टेशनला गु.र.नं १०८ / २०२२ भादवि कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा नोंद झाला होता.
सदर गुन्हयातील आरोपीने आपले लुसेंट स्टील प्रा. लि नागाने फर्म बंद करून मागील १० महिन्यापासुन तो फरार होता. सदर आरोपीचा शोध घेत असताना चंदननगर तपास पथकातील अंमलदार नामदेव गडदरे यांनी तांत्रिक विश्लेषनाचे आधारे तपास करून सदर आरोपी हा कानपुर उत्तरप्रदेश येथे असल्याची माहीती मिळाल्याने सदर आरोपीचा शोध घेणे करीता पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, पोलीस अंमलदार- बापु भुजबळ, सचिन रणदिवे, नामदेव गडदरे यांचे पथक कानपुरला रवाना होवुन सदर आरोपीस दि. ०३/०३/२०२३ रोजी सर्वेण्डी पोलीस थाना कानपुर उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेवून त्यास अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही मा. शशीकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ-४ पुणे शहर, मा. किशोर जाधव, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा.जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, चंदननगर पो स्टे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी गोरक्ष घोडके, पोलीस अंगलदार नामदेव गडदरे, बापु भुजबळ, सचिन रणदिवे, तांदळे, काळे यांनी केली आहे…
गुन्हाचा पुढील उपास जगन्नाथ जानकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे करत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…