उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौध्द धम्म संस्कार संघ, सांगली श्रावस्ती विहार यांच्या वतीने दि.08 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात तथागत भगवान बुध्द, जिजामाता, सावित्रीमाई, रमामाता, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेला हार व दीपप्रज्वलन करून उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ उपासक, उपासिका यांच्या हस्ते करण्यात येवून त्रिसरण व पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरवात झाली.
त्यानंतर महिला दिनानिमित्त लहान मुली, महिला, पुरुष यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या गुणांचे दर्शन दाखवून दिले. त्यामध्ये सामाजिक संदेश देणारे स्वागत गीत, सामुहिक नृत्य, कविता, गायन, भीम गीत, नाटिका, पोवाडा, पथनाट्य, वेशभूषा व इतर गुणदर्शन इत्यांदीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे विविध गुणदर्शन सादरीकरण करण्यात आले.घ त्यामध्ये महिला अत्याचारवरील सामाजिक, प्रबोधनात्मक, उत्कृष्ट असे पथनाट्य सावित्रीच्या लेकी सादर करण्यात आले. पथनाट्य लेखन आणि दिग्दर्शन आयु. विजय लांडगे यांनी केले. विहारातील महिला व मुलींनी यामध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेऊन उत्तम सादरीकरण केले. सहभागी कलाकारांचे खुप खुप अभिनंदन करण्यात आले त्यानंतर महिला दिनानिमित्त लहान मुली, महिला, पुरुष यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या गुणांचे दर्शन दाखवून दिले. त्यामध्ये सामाजिक संदेश देणारे स्वागत गीत, सामुहिक नृत्य, कविता, गायन, भीम गीत, नाटिका, पोवाडा, पथनाट्य, वेशभूषा व इतर गुणदर्शन इत्यांदीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे विविध गुणदर्शन सादरीकरण करण्यात आले.
श्रावस्ती विहाराच्या रणरागिणी महिला उपसिका महिला दिनानिमित्त सादर केलेले पथनाट्य, सावित्रीच्या लेकी यातील कलाकार खालील प्रमाणे होत्या दिपाली कांबळे (संचालिका) – मुलीच्या वडिलांच्या भूमिकेत, शैलजा साबळे (संचालिका) – प्रियकराच्या भूमिकेत, चेतना नागवंशी -मुलींची आईच्या भूमिकेत, प्रमिला मागाडे – प्रेयसीच्या भूमिकेत, रूपाली बनसोडे – सासरा या भूमिकेत, दीक्षा पवार- मुलाच्या भूमिकेत, मोहिनी नरवाडे- मुलाच्या वडिलांच्या भूमिकेत, स्वातीमित्रा अरुण कांबळे- सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत, प्रियंका कांबळे – डान्स कलाकार, पथनाट्य संकलन लेखन दिग्दर्शन- विजय लांडगे
सदरची नाटिका अंगावर शहारे आणणारी होती. सदर नाटिका सादर झाल्यानंतर चळवळीतील मित्र संविधानाचे अभ्यासक आयु.प्रमोदजी बनसोडे सर यांनी सदर नाटिका सादर करणाऱ्या वरील सर्वाचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक सर्वाना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. म्हणतात ना आपल्याच माणसाचा सन्मान आपणाच करायचा असतो जेणेकरुन त्या माणसाचा आत्मविश्वास वाढावा आणि त्याच्या केलेल्या कार्यालयाचा गौरव व्हावा, हा उद्देश मनी बाळगून प्रमोद बनसोडे सरांनी केलेला गौरव निश्चितच बळ देणारा होता.
त्यानंतर सन्मित्र प्रदीप कांबळे यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला व महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेच्या 3 विजेत्यांना भाग्यश्री दांडे, सपना भिसे, शैलजा साबळे सन्मित्र प्रदीप कांबळे यांच्या आई वडिलांकडून भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु. अमोल कांबळे यांनी केले, व उपस्थितांचे आभार आयु.नागवंशी सर यांनी मानले व शेवटी धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष- सुधीर कोलप, उपाध्यक्षा-सुनिता धम्मकिर्ती, सचिव-पवन वाघमारे, सहसचिव- भारत कदम सर, सहखजिनदार-आयु.जगन्नाथ आठवले, संचालक – संजय घाडगे, संचालिका- आयु.अवंतिका वाघमारे, संचालिका-शैलजा साबळे, संचालिका- दिपमाला कांबळे व चळवळीतील इतर उपासक उपासिका, बालक तथा बालिका उपस्थित होत्या.
तसेच 19 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी करण्यात आलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त भोजनासाठी तांदूळ, रवा व साखर देणाऱ्या मनिषा जमणे व त्यांच्या कुटूंबांचे आभार व उर्वरित सर्व भाजीपाला व इतर साहित्य भोजनासाठी देणाऱ्या आयु.सुधीर कोलप सर आणि प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर विहारात शेवट पर्यंत थांबून सहकार्य करणारे, दिपक कांबळे, राहूल कांबळे, प्रकाश शिवशरण, विजय लांडगे, सुरज कांबळे, यांचे विशेष आभार मानण्यात आले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…