स्वातंत्र्याच्या अमृतोमत्सवा निमित्त ‘आप’ ने काढली दीक्षाभूमी वरून तिरंगा रॅली.

दिल्ली मॉडेल संपूर्ण विदर्भात राबवण्यासाठी पक्ष निवडणूक लढवणार – महादेव नाईक, गोवा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र निवडणूक प्रभारी

विदर्भ आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत पक्ष पोहोचला आहे – महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे.


देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी

नागपूर:- देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पक्षाने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. गोवा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक व महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. तिरंगा यात्रा सुरू करण्यापूर्वी दीक्षाभूमीवर पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर रॅलीची सुरुवात – लोकमत चौक – व्हरायटी चौक – बर्डी मेन रोड – लोहापुल – आगारामदेवी चौक – वैद्यनाथ चौक – मेडिकल चौक – क्रीडा चौक – कमला नेहरू कॉलेज – सक्करदरा चौक – तिरंगा चौक – मंगलमूर्ती लॉन – जगनाडे चौक – रेशीमबाग चौक – श्री संत गुलाबबाबा सेवा आश्रम, ग्रेट नाग रोड, सिरसपेठ,   लोकांची शाळा जवळ समाप्त झाली.

रॅलीदरम्यान महाराष्ट्राचे खजिनदार जगजित सिंग यांनी ठिकठिकाणी सर्वसामान्यांना प्रबोधन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. रॅलीत शेकडो कार्यकर्ते देशभक्तीपर गाण्यांवर थिरकले. रॅलीदरम्यान ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’च्या  घोषणाही देण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत इतर सर्वसामान्य नागरिक आणि लहान मुलेही उपस्थित होते.

यानंतर संत गुलाबबाबा सेवा आश्रमात आम आदमी पार्टी विदर्भाचे पदाधिकारी अधिवेशन पार पडले. सुरुवातीलाच राज्याचे निवडणूक प्रभारी मा.महादेव नाईक यांनी दिल्ली मॉडेल महाराष्ट्रातील गल्लीबोळात नेनार ऐसे सांगितले व येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार. आम आदमी पार्टी दिल्लीसारखी मोफत पाणी, दर्जेदार शाळा बनण्याच्या तयारीत आहे. नगर पंचायत, नगरपरिषद व महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमृत महोत्सवानिमित्त तमाम देशवासियांना राष्ट्रीय तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. मागील तीन दिवसात राज्यातील सर्व विभागांमध्ये पदाधिकारी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच शहरे आणि खेड्यापाड्यात सर्वसामान्य जनता पक्षात सामील होत असल्याचे पाहायला मिळाले. आमचा पक्ष खूप वेगाने वाढत आहे. आता राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, त्याचा पर्याय फक्त आम आदमी पक्ष आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असताना जनतेला उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा, मोफत पाणी आणि वीज उपलब्ध करून देऊन अमृत महोत्सवाचा आनंद लुटण्याचे भाग्य आपण संपूर्ण देशात निर्माण करू. दिल्ली मॉडेल पंजाबपासून गुजरातपर्यंत आणि संपूर्ण देशात राबवणार आणि अरविंदजींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य संयोजक श्री.रंगा राचुरे यांनी महाराष्ट्रात संघटना विस्ताराचे काम सुरू करण्याच्या तयारीची माहिती दिली.

विदर्भातील सर्व निवडणुका आम्ही तयारीनिशी लढू आणि जिंकू, अशी माहिती आपचे विदर्भ अध्यक्ष डॉ.देवेंद्र वानखेडे यांनी दिली. यासाठी आमचे सर्व अधिकारी आपापल्या जिल्ह्यात परिश्रम घेत आहेत. येत्या निवडणुकीत त्याचा नक्कीच फायदा होईल. आजच्या अधिवेशनात सर्व जिल्हा अधिकारी व विदर्भ  पदाधिकारी उपस्थित आहेत. विशेषत: राज्य युवा संयोजक श्री.अजिंक्य सिंदे, राज्य कोषाध्यक्ष श्री.जगजित सिंग, राष्ट्रीय परिषद सदस्य श्री.अंबरीश सावरकर, श्री.अशोक मिश्रा, सचिव अविनाश श्रीराव, सहसचिव डॉ.केशव बांते, विदर्भ आरोग्य शाखा प्रमुख डॉ. जाफरी, किसान आघाडीचे प्रमुख श्री.मनोहर पलवार, युवा राज्य समिती सदस्या कृतल आकरे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

42 mins ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

1 hour ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

2 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

2 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

2 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

3 hours ago