पुरोगामी महाराष्ट्राला कलंक, पाण्यासाठी महिलांना अश्लील शिवीगाळ करत विवस्त्र होईपर्यंत बेदम मारहाण, मुंबई जवळील घटना.

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्र राज्याला हादवळनारी खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबई जवळील डहाणूमध्ये पाण्याच्या वादावरून महिलांना अश्लील शिवीगाळ करत विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा संताजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, डहाणूतील गंजाड नवनाथ कोहराळीपाडा येथे महिलांना अश्लील शिवीगाळ करत महिला विवस्त्र होईपर्यंत या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील नवनाथ कोहराळीपाडा येथील हा धक्कादायक प्रकार असून पाण्याच्या वादावरून ही घटना घडल्याची माहिती समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांच्या नातेवाईकां कडून ही मारहाण सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तसंच महिलांना ही मारहाण होत असताना गंजाड ग्रुप ग्रामपंचायतीचे भाजपचे उपसरपंच देखील या घटनास्थळी दाखल असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. काय आहे प्रकरण? गंजाड मधील नवनाथ कोहराळीपाडा या ठिकाणी सध्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचे काम सुरू असून या ठिकाणच्या अनेक बोरवेल आणि विहिरींनी तळ गाठला. त्यामुळे याच ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीच्या बोरवेलमध्ये मोटार टाकून काही कुटुंब पाणी घेत होती.

मात्र ग्रामपंचायतीने याला विरोध दर्शवला. त्यामुळे या घटनेतून झालेल्या वादाचे रूपांतरण पुढे हाणामारीत झाल्याचं पीडित महिलांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आता पर्यंत कोणताही गुन्हा डहाणू पोलीस ठाण्यात दाखल झाला नसला तरी समोर आलेल्या या हाणामारीच्या व्हिडीओनंतर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

7 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

18 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

18 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

19 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

19 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

19 hours ago