✒️मंगेश जगताप मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुबई:- जोगेश्वरी पुर्वेकडे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर पडली. यामध्ये रिक्षातून प्रवास करणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीसह तिच्या आईचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. आईचा जागीच मृत्यू झाला तर मुलीची उपचारावेळी प्राणज्योत मालवली. ही घटना समोर येताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील वेस्टर्न एक्सप्रेसवे शेजारी असलेल्या सोनार चाळ परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथून सायंकाळी चारच्या सुमारास एक महिला तिच्या मुलीसह मेघवाडीच्या दिशेने रिक्षाने जात होती. तेव्हा इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चौथ्या मजल्यावरून सळई थेट रिक्षावर पडली. ही घटना इतकी भीषण होती की, अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर महिलेसह मुलीला ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले. तिथे महिलेला मृत घोषित केले. तर मुलीचा उपचारावेळी मृत्यू झाला. दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सळई पडल्याने घडलेल्या या अपघातानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी मलकानी डेव्हलपर्स विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघात नेमका कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. स्थानिकांकडून माहिती घेतली जात असून याआधी असे प्रकार घडले आहेत का? यात डेव्हलपरचा दोष आहे का? इमारतीचे बांधकाम करताना कुणाला इजा होऊ नये याची काळजी डेव्हलपरने घेतली आहे की नाही याचा तपास आता जोगेश्वरी पोलिस करत आहेत.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…