देवेंद्र सिरसाट हिंगणा (नागपुर) तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- छत्रपति शिवाजी महाराज चौक, हिंगणा येथे शिवसेना हिंगणा तालुका व शिवछत्रपती बहुउद्देशिय संस्था हिंगणा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी फाल्गुन कृष्ण पक्ष ३. दि.१० मार्च रोज शुक्रवारी तिथीप्रमाणे भव्यदिव्य, पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमात सकाळी १० वाजता शिवप्रतीमेचे पूजन, रुद्राभिषेक, अभिषेक महापूजा श्री राजुभाऊ हरणे जिल्हाप्रमुख शिवसेना नागपूर व विष्णु कोल्हे शिवसेना तालुका प्रमुख व नगरसेवक हिंगणा यांच्या हस्ते पार पडली.
सायं ५ वाजता ढोल ताशा पथक तर्फे मानवंदना देण्यात आली, रात्री ७ वाजता छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सौ. लताताई गौतम नगराध्यक्ष नगरपंचायत हिंगणा व सौ. रचनाताई कन्हेरे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत सहभागी कलाकारांतर्फे पोवाडा, शिवकल्याण राजा गीते सादर करण्यात आली, सहभागी मुलं व मुलींनी विविध प्रकारचे नृत्यप्रकार सादर करण्यात आले, शिवशाही अवतरल्याचा प्रेक्षकांनी अनुभव घेतला, सहभागी कलावंतांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात राजेंद्र कोल्हे, हरिभाऊ चींचपुरे, विजयभाऊ नाटके, नंदुभाऊ कन्हेरे, जगदिश कन्हेरे माजी तालुका प्रमुख, संतोष कान्हेरकर शहरप्रमुख वानाडोंगरी, उमेश राऊत, तारूष बांदरे, शेषराव बनसोड, आशिष देशमुख, राजुभाऊ घवघवे, शंकर जांबुतकर, छत्रपाल बनसोड, सचिन हुडे, निखिल बनसोड, गजानन जवंजाळ, राजेश ठाकरे, वासुदेव गायधने, आदित्य कोल्हे , चंद्रशेखर राजनकर, महीला पदाधिकारी अश्विनी कान्हेरकर, माधुरी कोल्हे, चित्रा सायने, पुनम हुडे, रोहिणी तांबे सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…