राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी केले आर्थिक मदत, आस्थेने संवाद साधून केली विचारपूस

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील छल्लेवाडा येथील रहिवासी असलेले यशोदाबाई पोमा अजमेरा यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर यांनी तात्काळ छल्लेवाडा गाठून आस्थेने विचारपूस करत त्यांना आर्थिक मदत केली.

10 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास यशोदा बाई अजमेरा यांच्या घराला आग लागल्याने क्षणात त्यांचा होतंचं नव्हतं झाला. काही कळण्यागोदरच घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने त्यांचा लाखोंचा नुकसान झाला. याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऋतुराज हलगेकर यांना आपल्या कार्यकर्त्यांनी कळविले. आज ते छल्लेवाडा गाठून प्रत्यक्ष भेट देत अजमेरा यांच्याशी आस्थेने संवाद साधून आर्थिक मदत केली.तसेच भविष्यात कुठलीही मदत लागल्यास प्रत्यक्ष भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करा. मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार, अरुण मुक्कावार, मखमुर शेख, रामप्रसाद मुंजमकर, बापू पुताला आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

थेट तहसीलदारांसोबत साधले संवाद
छल्लेवाडा येथील घटनेची माहिती ऋतुराज हलगेकर यांनी अहेरीचे तहसीलदार यांना दिली व पंचनामा करून नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी केली. याशिवाय कुठल्या योजनेतून त्यांना मदत करता येईल याबाबत चर्चा केली.यावर तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अजमेरा कुटुंबीयांनी आभार मानले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून 15 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…

20 mins ago

सांगलीतील उद्योजक कुटुंबाचा बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…

52 mins ago

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

6 hours ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

7 hours ago