शहरातील शाळकरी मुले व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण.
✒️मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील अल्पवयीन मुलांनमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढू लागले आहे. गुटखा, दारू, सिगारेट, एलएसडी, फेवीबॉड, गांजा, एमडी यांच्या व्यसनांमध्ये अल्पवयीन मुलांचे आयुष्य उध्वस्त होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.
अगोदर दारु, सिगरेट आणि खरा यांचे व्यसन अनेक तरुणांना होते. आता तर त्यांच्या नशेची भूक वाढली आहे. आता हिंगणघाट शहरातील तरुण सऱ्हास पणे गांजा, अफिम, भांग, एमडी, ड्रगचा हे तरुण मोठ्या प्रमाणात वापर करून नशा करत आहे. त्यात आता शालेय विद्यार्थी पण मागे नसल्याची दिसून येत आहे.
काही मुलं यासाठी हे व्यसन करत आहे की, व्यसन न केल्यामुळे मित्रांमध्ये आपण एकटे पडू या भीतीने व अशा विविध कारणांमुळे शाळकरी मुले व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. सुरुवात सिगारेट, हुक्कापासून करणारा तरुण हळूहळू एलएसडी आणि गांज्याच्या आहारी जातो. अनेक शाळांमध्ये व्यसनी मुलांची गँग तयार झाली आहे. हिंगणघाट शहरातील तरुण व्यसन करणाऱ्यासाठी लागणाऱ्या पैश्यासाठी मुले गुन्हेगारीकडे वळू लागले आहेत. अवैध दारू आनणे, गांजा तस्करी या पण आता तरुण मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसून येत आहे. शहरातील रेल्वे लाईनच्या भागात, टाका ग्राउंड परिसरात, नॅशनल हायवे परिसरातील उडाण पुलाच्या खाली, आणि शहरातील आजू बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या लेआऊट परिसरामध्ये अनेक तरुण मुले गांजा, एमडी, ड्रॅग, हुक्का चे व्यसनी करीत आहे. हे प्रमाण गेल्या काही वषार्पासून वाढत आहे. बदलती जीवनशैली पालकांना कामामुळे मुलांना वेळ देता येत नाही. मुलांनी मागितल्यानंतर तत्काळ पैसै दिले जातात. पालक आणि मुलांमधील संवाद कमी झाला आहे. यामुळे मुले घरापेक्षा बाहेर जास्त राहत आहे. या शहरातील तरुण आज या व्यसनामुळे बर्बाद होत आहे.
पोलीस कधी घालणार आळा?
हिंगणघाट शहरामध्ये गांजा, एलएसडी, एमडी सहज उपलब्ध होत आहे. त्यात या मुलांना शहरामध्ये गुटखा, गांजा, एलएसडी, एमडी सारखे व्यवसानाधिक पदार्थ सहज उपलब्ध होत आहे. यामुळे मुले व्यसनाधीन होत आहे. अंमली पदार्थ विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तरी, मुलांना हे पदार्थ सहज मिळत आहे. याला आळा घालणारी पोलीस मात्र कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे पोलिसावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…