रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील जत विधानसभा मतदार संघाचे आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या वर खळबळजनक आरोप केले. त्यामुळे जत तालुक्यात आजी माजी आमदारानी एकमेकांन विरोधात आरोपाने तालुक्यातील राजकारण चांगलच तापल आहे. यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजला दिलेल्या प्रेस रिलिज मध्ये त्यांनी म्हटले आहे की.
यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की माजी आमदार विलास जगताप यावेळी यांनी माझ्यावरबेताल वक्तव्य करण्यापेक्षा त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कृत्यांचे स्मरण करावे. सन-२०१४-१९ या कालावधीत आमदार म्हणून निवडून आलात या कालावधीत विधानसभेत तालुक्याचे भेडसावणारे प्रश्न न मांडता जत ते मुंबई प्रवास, आमदार निवास आणि इतर अलिशान हॉटेलमध्ये मुक्काम ऐशआराम करणे या शिवाय काहीही काम केलेले नाही. भाजप या सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना तेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे २०१९ साली जनतेने आपला दारूण पराभव केला आहे. वृद्धापकाळात आपल्याला आता विश्रांतीची गरज असताना वैफल्यग्रस्त होऊन माझ्यावर आरोप करण्याशिवाय दुसरे काम नाही. स्वतचे आत्मचिंतन करून बेताल वक्तव्य थांबवावे. अन्यथा आपल्याबरोबर संघर्षासाठी मी कधीही तयार आहे.
आपली लायकी भाजपाने ओळखून तुमच्या आमदारकीच्या कालावधीत तुम्हाला लायकी प्रमाणे वागणूक दिली. व भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी समज दिली, त्यामुळे आपण विधानभवनात न जाता आमदार निवास इतर अलिशान हॉटेल यामध्ये झोपण्याशिवाय काहीही काम केले नाही. सध्या राज्यात भाजप शिंदे गटाचे सरकर असताना आपले कोणच पक्षाचे नेते ऐकत नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपण भाजपचे जेष्ठ माजी आमदार असताना त्यांनी आपली भेट नाकारली. जाहीर सभेत आपण आपल्याला बैठकीला बोलावत नाही गाडीत बसू देत नाही अशा तक्रारी करता अशा तक्रारी न करता जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी आणि जनतेने घरी बसवले आहे माजी आहात आता कशाची अपेक्षा बाळगू नये. आपल्या पक्षाने आपले गुण व कर्तुत्व पाहून तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमालासुद्धा आपण जाहीर केल्या प्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वेळ दिली नाही. लायकी दिसून येते.स्वत:चे पक्षाचे सरकर असताना सरकारच्या विरोधात बी टीम घेऊन आंदोलन करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. माझ्यावर टक्केवारीचा आमदार म्हणून आरोप करणाऱ्या माजी आमदाराने आमदार मधुकर कांबळे ,आमदार सुरेश भाऊ खाडे आणि स्वतःच्या आमदारकीच्या कालखंडात टक्केवारी गोळा करण्यासाठी स्वत:ची मुले एजंट म्हणून काम करत होते. हे तालुक्याला माहिती आहे. स्वतः तुमच्या मुलाने ठेकेदार म्हणून काम केले आहे हे आपण विसरला वाटते ? सगळ मलाच पाहिजे या हेकेखोर वृत्तीने आपल्या जवळचे कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले हे आपण विसरला का? त्यामुळे आपल्याला बी टीमची मदत घ्यावी लागत आहे. वृद्धापकाळी काहीही बोलून आपला उपयोग तालुक्याला होणार नाही. आपण कायमस्वरूपी गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारी प्रवृतीचे आहात हे जनेतला माहिती आहे. आपला राजकीय इतिहास पाहता अडवा-आडवी, जाळपोळ, भांडण, खून मारामारी या शिवाय आपला जीवनक्रमच नाही. सन-१९८२ ते १९९२ पर्यंत आपल्यावर उमदि पोलीस ठाण्यात ३२ फौजदारी गुन्हे आहेत. ते जाहीर पुरावा आहे. मला टक्केवारीचा आमदार म्हणून बेताल वक्तव्य न करता आधी आपल्या कारकिर्दीत काय दिवे लावले याचे आत्मपरीक्षण करून आरोप करावेत वैयक्तिक राजकारणासाठी कोन्तेव बोबलाद व परिसरातील गावातील किती भगिनींचे कुंकू पुसला त्याचे पाप जगतापला लागल्याशिवाय राहणार नाही.भाषणावेळी संत तुकाराम महाराजांचे अभंग सांगणे कृती मात्र राक्षस प्रवृतीची करणे.त्यामुळे आपण स्वतः काय चांगले केले काय वाईट केले यांचे आत्मचिंतन करावे.
जत तालुक्यातील २९ गावांच्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा कृती आराखड्याच्या विरोधात सर्वप्रथम मी शासनाकडे ती योजना यशस्वी होणार नाही म्हणून तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री महोदय यांचे समोर विशेष बैठक घेऊन प्रत्येक गावासाठी स्वतंत्र्य नळपाणी पुरवठा योजना व्हावी म्हणून बैठक घेतली होती.त्याबैठकीत पाणी पुरवठा सचिव,आयुक्त ,जिल्ह्यातील अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.त्याचा सभावृतांत माझाय्कडे आहे.तसेच पंचायत समिती सभागृह जत येथे २९ गावाच्या सरपंच आणि ग्रामसेवक यांची पाणीपुरवठा विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन सरपंच ग्रामसेवक यांना प्रादेशिक योजनेची माहिती देऊन त्यास विरोध केला आहे.तसे २९ गावांचे ग्रामसभेचे ठराव आणि सभावृतांत शासनास पाठविला आहे. त्यामुळे आपण सदर कामात मोठी टक्केवारी घेण्याचा आरोप धादांत खोटा आहे.जगतापने आता आपले वय झाले आहे लक्षात राहत नसल्यास उगीच खोटे आरोप करून तालुका वासीयांची दिशाभूल करू नये.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…