सहा वर्षाचे चिमुकल्याचे अपहरण करणा-या आरोपीस चाकण पोलीसांकडुन गजाआड, अपहरण केलेल्या बालकाची सुखरूप सुटका.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

चाकण पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २३/०२ / २०२३ रोजी चाकण पोलीस स्टेशन येथे अश्विनी उमेश सुर्यवंशी, वय ३० वर्षे व्यवसाय गृहिनी, रा. आगरवाडी रोड, चाकण ता. खेड जि. पुणे यांनी चाकण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली की, त्यांचा मुलगा नामे पारख उमेश सुर्यवंशी, वय ६ वर्षे, रा. आगकरवाडी रोड चाकण ता. खंड जि. पुणे यास दिनांक २२/०२/२०२३ रोजी सकाळी ०९/०० ते सायंकाळी ०७/०० वा. वे दरम्यान आगरकरवाडी रोडवरून मोकळ्या जागेत खेळत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे कायदेशिर रखवालीतुन अपहरण करून पळवून नेलेले आहे. वगैरे मजकुराची तकार दिले वरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टी नं २४२ / २०२३ भादवि कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आलेले आहे.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे तसेच चाकण पोलीस स्टेशनचे वपोनि श्री. वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकास सदर अपहृत मुलाचा व आरोपीचा शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्यांनतर चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने गुन्हयाचे घटनास्थळ परीसरातील तसेच घटस्थळावर येणारे जाणा-या रस्त्यावरील त्याच प्रमाणे चाकण परीसरातील सुमारे १०० पेक्षा जास्त ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी लक्षात आले की, सदर गुन्हयातील अपहृत बालकास सु-या नावाचा फिरस्ता इसम सोबत घेवुन जात आहे. परंतु सदर गुन्हयातील आरोपी सु-या याचे पुर्ण नाव तसेच पत्ता व ठाव ठिकाणा याबाबत काहीच उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती. चाकण पोलीसांनी सदर अपहरीत मुलाचा व आरोपीचा फोटो प्रसार माध्यमांमध्ये, सोशल मिडीयावर प्रसिद्धी पत्रक तसेच पुणे, ठाणे, रायगड, अहमदनगर जिल्हयातील रेल्वे स्टेशन, बस स्थानकांमध्ये भिंतीपत्रके चिटकवुन आरोपी व अपहरीत बालकाची माहिती मिळाल्यास आरोपी व पोलीसांना माहिती देण्याबाबत प्रसिद्धी दिली होती. तसेच सदर आरोपी व अपहरीत मुला बाबत गोपनीय बातमीदार यांना माहिती दिलेली होती. तसेच चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने आरोपी बाबत लोणावळा येथे जागुन अपहृत बालकाचा शोध घेतला. तपास पथक सदर गुन्हयातील आरोपी व अपहृरीत मुलाचा कसोशीने शोध घेत असतांना दिनांक १०/०३ /२०२३ रोजी बेहरगाव ता. मावळ जि. पुणे येथील पोलीस पाटील अनिल पडवळ यांनी सपोनि प्रसन्न ज-हाड व सफौ सुरेश हिंगे यांना माहिती दिली की, नमुद गुन्हयातील अपहृरीत मुलगा व एक फिररता इसम कार्ला येथे दिसत आहे. सदर माहितीचे अनुषंगाने चाकण पोलीसांनी कार्ला ता. मावळ जि. पुणे येथुन अपहरीत मुलगा पारख उमेश सुर्यवंशी, वय ६ वर्षे यास आरोपी सुरेश उर्फ सु-या लक्ष्मण वाघमारे वय ४५ वर्षे, रा. पठारवाडी चाकण ता खेड जि पुणे मुळ रा. देवघर वाकसाई ता. मावळ जि. पुणे याचेकडुन ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीस गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन अपहृरीत मुलगा पारख यास सुखरून त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील आरोपी बाबत कोणतीही उपयुक्त माहिती नसतांना चाकण पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने जुन्या पारंपारीक पद्धतीचा व बातमीदारांकडुन मिळालेल्या माहिती उपयोग करून आरोपीस ताब्यात घेवुन अपहृरीत गुलावी त्याचे ताब्यातुन सुखरूप सुटका केलेली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, पोकों / नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केलेली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसन्न ज-हाड हे करीत आहेत.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

13 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

13 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

13 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

14 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

14 hours ago