हिंगणघाट तालुक्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज रखडले.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणी ला घेऊन राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोमवारी (ता. १३) झालेली बैठक निष्फळ ठरल्याने वर्धा जिल्हातील व हिंगणघाट तालुक्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून मंगळवार बेमुदत संपावर आहेत. यामध्ये सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. मात्र, राज्य सरकारने ही योजना लागू करण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

44 mins ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

2 hours ago