आ.विनायक मेटे यांच्या निधनामुळे उद्या बाजारपेठ बंद-व्यापारी महासंघ कॅट

बीड (प्रतिनिधी श्याम भूतडा ) :- शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे लढवय्ये नेते तथा मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे माजी आ. विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे बीड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. ही पोकळी कधीही भरुन येणार नाही.विनायकराव मेटे यांच्या पार्थीवावर उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी बीड शहरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने उद्या 15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून सर्व व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून मेटे साहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहर अध्यक्ष विनोद पिंगळे व इतर पदाधिकार्‍यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी नमुद केले आहे की, बीड जिल्ह्यातील धडाडीचे नेते, माजी आ.विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याची मोठी हानी झाली आहे. त्यांचे मराठा आरक्षण, ऊसतोड कामगारांचे प्रश्न यातील योगदान कधीही विसरता येणार नाही. सामाजिक विषयांवर आवाज उठवणार्‍या नेत्याला संपूर्ण राज्य मुकले आहे.त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने बीड जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून मेटे साहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहर अध्यक्ष विनोद पिंगळे व इतर पदाधिकार्‍यांनी केले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

14 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

16 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago