हिंगणघाट शिवाजी पार्क येथे महिला दिनानिमित्त भव्य महीला मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, शक्ती शहर स्तर संस्था (CLF) नोंदणी क्र, महा/७०/२०१७ या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक १३ मार्च रोज सोमवार ला दुपारी १२:०० वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिला राजुरकर शक्ती शहर स्तर संस्थेचे सचिव यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ, सावित्री, माई रमाई याच्या प्रतिमांना पुष्प माल्या अर्पण करून मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले या नंतर सर्व मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्या मधे प्रामुख्याने उपस्थित सुजाता जावळे DAY/NULM शहर अभियान व्यवस्थापक न. पा. हिंगणघाट या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभल्या यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच खुप मोलाचे मार्गदर्शन केले, यावेळी सुलभा इंदुरकर समुह संघटीका न. पा. हिंगणघाट प्रमुख पाहुणे म्हणून लाभले यांनी आपले मार्गदर्शन करुन विविध योजनांची माहिती दिली, मिनाक्षी कटारे समुह संघटीका न. पा. हिंगणघाट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांनी आपले मार्गदर्शन कले तसेच ॲड. शमा सुटे प्रमुख वक्ते म्हणून लाभल्या यांनी महिलांना संविधानीक रित्या महिलांचे अधीकार होनारे छळ आणि महिलांच्या चुका या विषयावर खुप छान हृदयस्पर्शी वक्तव्य केले. अनु मानकर शक्ती शहर स्तर संस्था (CLF) अध्यक्षा यांनी आपले अध्यक्षीय समारोप केले. यावेळी ऍड. गोडघाटे, ऍड. जरुशा पिटर, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष निर्मला भोंगाडे, सहसचिव कल्याणी इटनकर, कोषाध्यक्ष निर्मला गाडेकर यांची मंचावर उपस्थित होत्या.

या नंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, थोर महामाता महीलांन वर आधारित वेषभुषा स्पर्धा, गित गायन स्पर्धा, डान्स स्पर्धा, नाटक, संगीत खुर्ची स्पर्धा, घेण्यात आल्या त्या मधे क्रीडा, कला व सांस्कृतिक स्पर्धांपैकी प्रामुख्याने सर्व महिलांनी भाग घेतला, विजयी झालेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र (प्रशस्तीपत्र) देण्यात आले महिलांनी खूप आनंदाने महिला जागतिक दिवस साजरा केला त्या नंतर चहा बिस्कीट घेऊन आनंदी झाले, कार्यक्रमाची सांत्वना, सीआरपी अर्चना सुखदेवे यांनी आभार मानले अशा प्रकारे कार्यक्रमाची सांत्वना झाली सर्व संस्थेमधील पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व सिआरपींनी सहकार्य केले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

57 mins ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

2 hours ago