अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- खासगी दवाखाने चालवणाऱ्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर वर कारवाई करा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोउपचार रुग्णालयातिल अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयातील बरेचसे डॉक्टर खासगी दवाखाने चालवत असुन रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाही. शासकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोउपचार रुग्णालयातिल तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयातील अनेक डॉक्टर हे नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे खासगी दवाखाने चालवत असुन स्वतःचे व्यवसाय करत आहेत.शासन नियमाप्रमाणे शासकीय रुग्णालयातील, प्राथमिक आरोग्य केंद्र,व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर खासगी दवाखाने चालवु शकत नसतांनाही डॉक्टर एकीकडे सर्वोपचार रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात सेवा देतात.तर, दुसरीकडे स्वतःचे खासगी दवाखाने उघडुन ही व्यवसाय करत आहेत.त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…