युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निम सरकारी, १शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करणे या मागणीसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून पंचायत समिती कळमेश्वर समोर बेमुदत संप सुरू केलेला आहे.
यामध्ये सर्व कर्मचारी हे सक्रिय सहभाग घेत आहे. आपल्या देशातील पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि आता हिमाचल प्रदेश सरकार जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असताना महाराष्ट्रातील राज्य सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.यातून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सरकार वरील विश्वास उडत जाऊ शासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळ शासन जोपर्यंत महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करीत नाही तोपर्यंत दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप करण्याचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे.
सदर संघात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सक्रिय सहभागी झालेले आहेत.या कार्यक्रमात आशुतोष चौधरी राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, प्रशांत महाजन जिल्हा उपाध्यक्ष, उमेश चोरे जिल्हा कार्याध्यक्ष नागपूर, शेषराव गोतमारेआरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग प्रतिनिधी मोहन लखमापूर तालुकाध्यक्ष कळमेश्वर, सुशांत जाधव सचिव ग्रामसेवक संघटना कळमेश्वर सुशील रहाटे अधीक्षक पंचायत समिती कळमेश्वर, यशवंत लिखार विस्तार अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर, कर्मचारी व तालुक्यातील शासकीय निम शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर त्याचप्रमाणे ग्रामसेवक बहुसंख्येने संपामध्ये सहभागी झालेले होते
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…