ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) महाराष्ट्र राज्याच्या वतीने कामगार कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० रद्द करा, कामगार कर्मचारी विरोधी कामगार कानून रद्द करा, सर्व सरकारी उद्योगांचे खाजगीकरण थांबवा व केलेले खाजगीकरण रद्द करा, शासकीय विभागातील अंशकालीन व करार तत्वावर नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, केंद्र व राज्य यांच्या अखत्यारित असलेली शाळा, महाविद्यालय व विद्यापीठे स्वायत्त (खाजगीकरण) करू नका, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप अदा करा, डॉ. विनायक काळे अधिष्ठाता ससून वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या असंवैधानिक बदलीचे व पदावनतीचे आदेश त्वरित रद्द करा. या मागण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व सहयोगी सर्व संघटनां महाराष्ट्र राज्याच्या वतीने दि.१३ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यांमध्ये एकाच टप्प्यामध्ये धरणे आंदोलन व निवेदन देण्याचे आंदोलन घोषित करण्यात आले.
दि.१३ मार्च २०२३ आज रोजी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ नंदुरबार च्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार, यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनामध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, राज्य परिवहन महामंडळ (RMBKS) विंग्ज चे प्रदेशअध्यक्ष, मा.रोहिदास वळवी, तसेच नंदुरबार जिल्याचे RMBKS चे पदाधिकारी, मा.ईश्वर वसावे, विनायक के. गावीत, यश कोकणी, सुरेश गावित, धिरसिंग वळवी व कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…