प्रशांत जगताप मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आधार फाउंडेशनच्या आधार महिला मंच द्वारा साई हॉल, नंदोरी रोड हिंगणघाट येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .आधार फाउंडेशन नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असल्यामुळे शहरामध्ये नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिलेले आहे. त्यांची यशस्वी वाटचाल त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमधून दिसूनच येत आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला महोत्सवाच्या निमित्ताने महिलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे विविध तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाकरिता प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे हा परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा गौरव आणि नामांकित वक्तांच्या व्याख्यानाचे आयोजन असा हा भरगच्च सप्तरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती स्मिता कांबळे, अधिवत्ता उच्च न्यायालय नागपूर या होत्या. विशेष मार्गदर्शक श्रीमती डॉ. उषा किरण थुटे ,अध्यक्ष ग्रामीण विकास संस्था हिंगणघाट हे होते. प्रा. डॉ. सुरेखा देशमुख, समाजसेविका, सौ. ज्योती देशमुख, शोभा पोद्दार, पुष्पा टिबडेवाल व विशेष अतिथी मध्ये डॉ. प्रणाली सायंकार स्त्रीरोग तज्ञ, डॉ. सोनल गोयंका, मानसोपचार तज्ञ, डॉ. डिम्पल घुबडे(मोटघरे) आयुर्वेदाचार्य व डॉ. प्रियंका बोंडे भौतिकोपचार तज्ञ यांची उपस्थिती होती. या महिला महोत्सवा मध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रास्तविकातून सौ. माधुरी विहीरकर यांनी आधार फाउंडेशन राबवित असलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमाची गरज आधार फाउंडेशनची विचारधारा व कार्यपद्धती सांगत काळानुरूप आपण बदल स्विकारून प्राप्त परिस्थितीशी ला अनुसरून उपक्रम राबवल्यास समाजकार्याला योग्य दिशा प्राप्त होते असे प्रतिपादन करत महिला महोत्सवाची रूपरेषा प्रास्ताविकातून विशद केली.
यावेळी अध्यक्षिय भाषणामधून अँड. स्मिता पाटील यांनी महिला सक्षमीकरण म्हणजे काय सावित्रीचे कार्य व महत्त्व महिलांचे अधिकार आणि कर्तव्य याच्यावर प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी प्रा. डॉ.उषाताई थुटे यांनी समतेचा व समानतेचे मंत्र सांगत संस्काराची शिदोरी घेऊन आपण जगलं पाहिजे असे सांगत आधार फाउंडेशन हिंगणघाट मध्ये अतिशय उत्कृष्टरित्या कार्य करीत असल्या बद्दल त्यांच्या कार्याचे गुणगौरव करत त्यांनी अभिनंदन केलं. ज्योती देशमुख, प्रा.सुरेखा देशमुख यांनी आपले विचार मांडले व आधार महिला मंचाच्या उत्कृष्ट कार्यक्रम आयोजना बद्दल
कौतुक केलं.
त्यानंतर डॉक्टरांचा परिसंवाद प्रश्न तुमचे उत्तर तज्ञाचे मध्ये महिलांमध्ये वाढत्या व्यंधत्वाचे प्रमाण व त्याचे उपचार स्त्रियांमध्ये गायनिकल प्रॉब्लेम यावर डॉ. प्रणाली सांयकार यांनी उत्तरे दिली. तसेच मानसिक संतुलन मानसिक आरोग्य योग्य राखण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे डॉ. सोनल गोयंका यांनी तर आयुर्वेद पद्धतीने ट्रेस मॅनेजमेंट कसं करावं पंचकर्मातून महिलांचे विविध प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवता येईल याच्यावर आयुर्वेदाचार्य डॉ. डिंम्पल घुबडे (मोटघरे) यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्त्रियांचे विविध आजारा साठी उपयुक्त व्यायामाचे प्रात्यक्षिकातून डॉ. बोंडे यांनी सांगीतले. यावेळी प्रेक्षकांमधून आलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ञांनी दिली.
त्यानंतर शहरामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये मयुरी नव्हाते, शबाना कुरेशी, अँड.शिवानी सुरकार, प्रा. शितल ठाकरे, अंजू परावर, रुचिका शंभरकर, रश्मी मुंगल, धनश्री गाठे,साक्षी कुडमेथे जोत्स्ना बावणे, डॉ.मनीषा रिठे तर हिंगणघाट शहरामध्ये अनेक सेवाभावी संस्थाचे सत्कार करण्यात आले . त्यामध्ये नारायण सेवा समिती, ॲनिमल रेस्क्यू टीम, निसर्ग साथी फाउंडेशन, मंगलम इव्हेंट्स, पन्नास वर्षे पूर्ण वर्षापासून सेवा देत असणाऱ्या भजन मंडळाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये न्युट्रिशन फुड डिश मध्ये प्रथम प्रियंका ढगे, द्वितीय सुनीता झाडे, तृतीय मेघा नहार. लेमन स्पृन बॅलन्स रेस मध्ये प्रथम पूजा पांढरे ,द्वितीय प्रणाली घुमडे ,तृतीय रेखा झाडे यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. विजेता स्पर्धकाचे अभिनंदन करण्यात आले या महिला महोत्सवाचे सुत्र संचालन कु.मयुरी देशमुख व आभार प्रदर्शन सौ. मायाताई चाफले यानी केले यशस्वी आयोजना करिता वीरश्री मुडे, ज्योती धार्मिक स्वाती वांदिले , वैशाली लांजेवार, अनिता गुंडे, शुभांगी नायर (वासनिक) राणी सोमवंशी, किरण निमट, सुमन डांगरे, राजश्री विरूळकर, निता गजबे, निलाक्षी बुरीले, प्रीती कलोडे, वैशाली हेडाऊ, स्वाती राऊत,ममता चावट, हर्षा बोरकर, आशा कोसुरकर, उषा गुडघे, सुनिता डांगरे, जयश्री पिसे, मीनाक्षी फुलबांदे, अनुराधा मोटवानी, किरण अग्रवाल, रश्मी धायवटकर, छाया पांढरे, कंचन खिवसरा, रिता पुसदेकर, शुभांगी कारामोरे, चंदा कोठारी, संगीता सिंघवी, रंजना बोरकर, शिल्पा हिंगणे, हेमलता खैरकार आदिनी सहकार्य केले. ह्या मेळाव्याला परिसरातील शेकडो महिलांची उपस्थिती होती.
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…