राजुरा शहरात परीक्षा योद्धा चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह संपन्न.

प्रथम क्रमांक कस्तुरी बेले, द्वितीय अमित पेंदाम, तृतीय सबा परवीन शमीम शेख यांनी पटकवीला.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने राजुरा शहरातील अनेक शाळाच्या शेकडो विद्यार्थीनी या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता.

राजुरा शहरात झालेल्या चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्व. नामदेवराव जाधव प्राथमिक आश्रम शाळा राजुरा येथील शिक्षक किशोर डी.भागवत यांनी उत्कृष्ट परीक्षक म्हणून काम पाहिले व विद्यार्थाना योग्य मार्गदर्शन केले. या अनुषंगाने राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांचे उपस्थित व त्याचे हस्ते किशोर भागवत यांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

तसेच पहिला क्रमाक प्राप्त आदर्श हायस्कुल राजुराची विध्यार्थीनी कस्तुरी रवींद्र बेले हिला प्रमाणपत्र व पाच हजार रुपयाचे रोख रक्कम बक्षीस, श्रुती गणेश रायपूरे हिला पाचशे रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक अमित अनिल पेंदाम, गोपिकाबाई सांगडा पाटील आश्रम शाळा, तृतीय क्रमांकसबा परवीन शमीम शेख, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजुरा यांनी पटकवीला. प्रोत्साहनपर दहा विध्यार्थी तर सहभागी सर्वच विध्यार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले. आदर्श हायस्कुल येथील बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, भाजपचे युवा नेते सचिन बैस, अँड. नितीन वासाडे, महिला आघाडीच्या नेत्या स्वरुपा झंवर, माजी नगरसेविका प्रियदर्शनी उमरे, शितल वाटेकर, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक बादल बेले आदीची उपस्थिती होती. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले. सहभागी सर्वच स्पर्धेकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

59 mins ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

12 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

13 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

13 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

13 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

13 hours ago