पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 2, गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 कडील स्टाफ वाहन चोरी व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार गणेश लोखंडे यांना बातमी मिळाली की, एक मुलगा मांजरी बुद्रुक येथे रोड च्या बाजूला झाडाखाली चोरीच्या गाडीवर बसला आहे अशी बातमी मिळाल्याने वपोनि श्री सुनिल पंधरकर यांचे आदेश व सूचनाप्रमाणे सदर बातमी प्रमाणे गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 कडील अंमलदार यांनी बातमीप्रमाणे खात्री करून एका मुलास स्टाफच्या मदतीने पकडून ताब्यात घेऊन त्यास नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव किशोर उत्तम शिंदे वय ३० वर्ष, रा वेताळ वस्ती अशोक घुले यांच्या रूममध्ये भापकर मळा मांजरी बुद्रुक ता. हवेली, जि. पुणे असे असलेचे सांगितले त्यावेळी त्यांच्या कब्जातुन १) सुझुकी GS 150 R २) हिरो होंडा एक्टिवा दोन दुचाकी वाहने अशा किंमत रुपये ३०,०००/- च्या २ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांचे बाबत माहिती घेता सदरबाबत चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे
१) गु र नं २००/२०२३ भादवि कलम ३७९
२) गु र नं २१३/२०२३ भादवि कलम ३७९
प्रमाणे गुन्हे दाखल असलेचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीस चतु: श्रृंगी पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाई कामी ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सर , मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री.नारायण शिरगांवकर सर ,व.पो.नि सुनील पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विनायक रामाणे, मनोज खरपुडे, गणेश लोखंडे, राहुल इंगळे, ,विक्रांत सासवडकर, सुदेश सपकाळ यांनी केली आहे…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…